जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या यांपासून गोवा मुक्त करा ! – आमदार टी. राजासिंह

हिंदु जनजागृती समितीच्या फोंडा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ३ सहस्रांहून अधिक हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

सभेमध्ये बोलताना श्री टी. राजसिंह

फोंडा, २४ मे (वार्ता.) – जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या यांपासून गोवा मुक्त करा. गोव्यात धर्मांतराला विरोध करणारे पूर्वज जन्मले आहेत, हे लक्षात घ्या, असे आवाहन भाग्यनगर येथील आमदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. टी. राजासिंह यांनी फोंडा येथे २४ मे या दिवशी केले. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत प्रमुख वक्ते या नात्याने ते बोलत होते. राज्यातील काही हिंदुत्वद्वेष्ट्यांनी सामाजिक माध्यमे आणि प्रसारमाध्यमे या माध्यमांतून सभा आणि श्री. टी. राजासिंह यांच्याविषयी अपप्रचार करूनही त्याला न जुमानता फोंडा आणि परिसरातील ३ सहस्रांहून अधिक हिंदू सभेला उपस्थित राहिले.

आमदार टी. राजासिंह यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, हेच ध्येय आहे. भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, अशी मागणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी सर्वप्रथम गोव्यातून केली आहे.

टी. राजासिंह पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे गोव्यातील कार्य उल्लेखनीय आहे. गोव्यातील ‘हात कातरो खांब’ आदी गोव्यातील संघर्षाच्या इतिहासाविषयी माहिती पर्यटकांना दिली पाहिजे. गोव्यात केवळ समुद्रकिनारे आहेत, ही दृष्टी आपणास पालटली पाहिजे. गोव्यात पवित्र प्राचीन मठ आणि मंदिरे आहेत. गोव्याची संस्कृती प्राचीन आहे. याकडे सर्वांचे लक्ष वेधले पाहिजे. गोव्यात आता जिहाद्यांचा शिरकाव झाला आहे. गोव्यातील हिंदू जागृत होत आहेत; म्हणून मर्दनगड अधिसूचित होत आहे. गोव्यातील झोपलेल्या इतर हिंदूंना जागे केले पाहिजे. झोपलेले हिंदू जागे न झाल्यास त्यांची पुढील पिढी संपणार, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांचे वंशज आहोत. त्यामुळे विनाकारण आमच्या वाटेला जाऊ नये. गोवा ही भूमी जिहाद्यांचा अड्डा बनायला देऊ नये. गोव्यात बांगलादेशी रोहिंग्या घुसले आहेत. जिहाद्यांना धडकी बसेल, अशी कृती झाली पाहिजे. आज मौलवीसुद्धा गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहेत आणि ही एक चांगली गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करावे आणि यामुळे देशभरात गोहत्या बंद होऊ शकेल. हिंदूंचे रक्षण केवळ भगवाच करू शकतो. हिंदू जागृत झाले, तर इतिहास पालटू शकतो, हे बंगालच्या निवडणूक निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भारताला हिंदु राष्ट्र घोषित करून देशात जनसंख्या निमयंत्रण कायदा करावा. प्रत्येक हिंदूने आठवड्यातील २ घंटे हिंदु धर्माचा प्रचार करण्यासाठी द्यावे. हिंदु जनजागृती समिती विनामूल्य शिकवत असलेले स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे  धडे घ्यावे.’’

भगवान परशुराम हाच खरा ‘गोंयचो सायब’ (गोव्याचा साहेब) ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

सामाजिक माध्यमांतून काही जण सभेच्या विरोधात मते व्यक्त करतात; मात्र त्यांचे किती जण ऐकतात ? हा प्रश्न आहे. ‘फोंडा येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा झाली, तर येथे सांप्रदायिक प्रश्न निर्माण होणार’, असा अपप्रचार करण्यात आला. घडलेला सत्य इतिहास मांडला, तर आम्ही धर्मांध कसे? इतिहास अप्रिय असेल, तर घडले तसेच सांगितले पाहिजे. गोमंतक निर्माण करणारा भगवान परशुराम हाच खरा ‘गोंयचो सायब’ आहे.

हिंदूंवर झोलेल्या अन्यायाला वाचा फोडायला आज बंदी असेल, तर आम्ही खरेच स्वतंत्र झालो आहोत का ? देशात हिंदु बहसंख्य आहेत, म्हणून येथे शांतता आहे. काश्मीर आणि नागालँड तेथे शांतता आहे का ? ‘हात कातरो खांब’ आणि फोंडा येथील मर्दनगड गोवा सरकारने अधिसूचित केल्याने फोंडा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा ही एक विजयी सभा आहे. देश स्वतंत्र झाल्यावर गोव्याला स्वतंत्र व्हायला १४ वर्षे का लागली? हा प्रश्न काँग्रेसला विचारला पाहिजे.

गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा दिला पाहिजे

सभेला मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी झटणारे ‘मराठी राजभाषा निर्धार समिती’चे प्रा. सुभाष वेलिंगकर उपस्थित आहेत. गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याची ‘मराठी राजभाषा निर्धार समिती’ची मागणी योग्य आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि आम्हाला विदेशी भाषा नको आहेत.

फोंडा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा घटनाक्रम

१. हिंदु राष्ट्र-जागृती सभेला विघ्नहर्त्या श्री गणेशाचा सामूहिकरित्या श्लोक म्हणून आणि शंखनाद करून प्रारंभ झाला.

२. भाग्यनगरचे आमदार श्री. टी. राजासिंह, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपिठावर ‘मर्दनगड संवर्धन समिती’चे सर्वश्री राजेंद्र देसाई, मनोज गावकर आणि सुचेंद्र अग्नी यांची उपस्थिती होती.

३. आमदार टी. राजासिंह यांच्या हस्ते व्यासपिठावरील शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

४. सनातन वेदपाठशाळेतील पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी आणि श्री. सिद्धेश करंदीकर यांनी भावपूर्णरित्या वेदमंत्रपठण केले. वेदमंत्रपठण करणार्‍या पुरोहितांचा या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीपाद अरगडे यांनी सन्मान केला.

हे ही वाचा →

५. आमदार श्री. टी.राजासिंह यांचा सन्मान बोरी पंचायतीचे विद्यमान पंचसदस्य श्री. सतीश बोरकर यांनी केला, तर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा सन्मान फोंडा येथील हिंदुत्वनिष्ठ व्यावसायिक श्री. मयूर कन्नावर यांनी केला.

६. गोव्यात देव, देश आणि धर्म रक्षणार्थ कृतीशील असलेल्या ‘हिंदु युवा शक्ती, गोवा’ या संघटनेच्या सदस्यांनी आमदार श्री. राजासिंह यांचा या वेळी सत्कार केला.

७. हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य संघटक श्री. सत्यविजय नाईक यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर वक्त्यांनी सभेला संबोधित केले.

८. सभेचे सूत्रसंचालन सौ. गौरी नायक आणि श्री. राहुल वझे यांनी केले.

सभेची क्षणचित्रे

१. भाग्यनगरचे आमदार श्री. टी. राजासिंह यांची ही गोव्यातील दुसरी सार्वजनिक सभा आहे. यापूर्वी त्यांची सावर्डे येथे भव्य अशी सार्वजनिक सभा झाली होती.

२. व्यासपिठाच्या मागे किल्ल्याचे चित्र लावण्यात आले होते.