
पुणे – १ ते २२ मे या अवघ्या २२ दिवसांच्या कालावधीत पुणे शहर परिसरातून १२३ महिला/मुली बेपत्ता झाल्याची नोंद ‘गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली’वर झाली आहे. सामाजिक माध्यमावरील अनोळखी व्यक्तींशी वाढती मैत्री, प्रेमाचे आमीष, लग्नाचे खोटे आश्वासन आणि फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार या घटनांमागील प्रमुख कारणे असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक अन्वेषणात समोर आले आहे. हडपसर, कोंढवा, चंदननगर आणि फुरसुंगी यांसारख्या परिसरांमधूनही अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांपर्यंत आल्या आहेत. बेपत्ता झालेल्या महिला आणि मुली यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांकडून विशेष पथके तैनात करण्यात आली असून शोधमोहीम चालू आहे. (यामध्ये ‘लव्ह जिहाद’ची नेमकी किती प्रकरणे आहेत ? हेही पुढे आले पाहिजे ! यावरून पुणे येथे कायदा-सुव्यवस्था आणि पोलीसयंत्रणा आहे कि नाही ? असा प्रश्न कुणाला पडल्यास आश्चर्य ते काय ? पुण्यातील ही स्थिती अतिशय गंभीर असून या स्थितीवर कठोर उपाययोजना करायला हव्यात ! – संपादक)
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !