Bengal BJP Letterhead : बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी त्यांच्या अधिकृत ‘लेटरहेड’वरून हिंदी आणि उर्दू भाषा हटवली !

ममता बॅनर्जी यांनी घातली होती हिंदी आणि उर्दू

कोलकाता (बंगाल) – राज्याचे भाजप सरकारचे नवनियुक्त मुख्यमंत्री शुभेंदु  अधिकारी यांनी त्यांच्या अधिकृत ‘लेटरहेड’वरून उर्दू आणि हिंदी भाषा हटवून ते पुन्हा ‘द्विभाषिक’ (बंगाली आणि इंग्रजी) केले आहे. यासमवेतच त्यांनी पूर्वीच्या ममता बॅनर्जी सरकारचे अत्यंत आवडते प्रतीक असलेल्या ‘बिस्वा बांग्ला’चा ‘बी’ आकाराचा लोगोही काढून टाकला आहे. वर्ष २०११ मध्ये सत्तेत आल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सरकारी लेटरहेड ‘चतुर्भाषिक’ (चार भाषांतील) केले होते, ज्यामध्ये बंगाली आणि इंग्रजीसमवेतच हिंदी अन् उर्दू यांचाही समावेश होता.

संपादकीय भूमिका

शुभेंदु अधिकारी सातत्याने घेत असलेल्या निर्णयांतून ममता बॅनर्जी यांनी किती प्रमाणात मुसलमानांचे लांगूलचालन करत हिंदु आणि राष्ट्र घात केला होता, हे यातून लक्षात येते !