
‘वाराणसी आश्रमातील ध्यानमंदिरात श्रीरामाची विलोभनीय मूर्ती आहे. प्रतिदिन त्या मूर्तीची पूजा होते, तसेच सकाळी आणि संध्याकाळी तेथे आरती केली जाते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या ६ ते १० मे २०२६ या कालावधीत प्रतिदिन सकाळी ६.४० वाजता ध्यानमंदिराच्या खिडकीतून सूर्याचे किरण प्रभु श्रीरामाच्या मूर्तीवर पडलेले दिसले. अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीवर सूर्यतिलक होण्यासाठी व्यवस्था केली आहे; मात्र वाराणसी आश्रमात अशी कुठलीही व्यवस्था केली नसतांनाही सूर्याचे किरण प्रभु श्रीरामाच्या मस्तकापासून अनाहतचक्रापर्यंत पडत होते. साक्षात् सूर्यदेवाने आम्हा सर्व साधकांना काळानुसार दिलेली ही मोठी अनुभूती आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या कालावधीत अशी अनुभूती येणे’, म्हणजे ‘काळानुसार गुरुदेवांच्या श्रीविष्णुरूपातील श्रीरामतत्त्व जागृत झाले आहे आणि हा रामराज्याच्या स्थापनेचा दैवी संकेत आहे’, असे आम्हाला वाटले. विशेष म्हणजे हे सूर्यकिरण केवळ ५ दिवस, म्हणजे ६ ते १० मे २०२६ या कालावधीतच श्रीराममूर्तीवर पडलेले दिसले. त्यानंतर त्यांची दिशा पालटली.’
– (सद्गुरु) नीलेश सिंगबाळ (वय ५९ वर्षे), पूर्व भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१८.५.२०२६)
संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व !
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
म्हातारपणातील कंटाळ्यावर एकमेव उपाय म्हणजे, नामजप करणे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे