भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला सुनावले खडेबोल
पाकने काश्मीरचा प्रश्न केला होता उपस्थित !

न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने पाकिस्तानला शब्दांत फटकारले. परिषदेत एका चर्चेच्या वेळी पाकने काश्मीरचे सूत्र उपस्थित करत भारताने त्यावर अनधिकृत नियंत्रण मिळवल्याचे आणि तेथे जनमत चाचणी घेण्याचे वक्तव्य केले असता भारताच्या संयुक्त राष्ट्रांमधील स्थायी प्रतिनिधीने पाकवर जोरदार टीका केली. भारताचे प्रतिनिधी हरीश पार्वतानेनी म्हणाले की, नरसंहाराचा दीर्घकाळ डागाळलेला इतिहास असलेल्या पाकने भारताच्या पूर्णपणे अंतर्गत असलेल्या सूत्रांचा उल्लेख करणे, हा विरोधाभास असून त्याला असे करण्याचा कोणताही अधिकार नाही.
A nation with a long history of genocide and persecution has no moral right to lecture India! 🇮🇳
India strongly slammed Pakistan at the UN for once again raising the Kashmir issue.
Exposing Pakistan before the world is necessary, but words alone are not enough.
India must now… pic.twitter.com/5jxG7XwRNg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 21, 2026
पाकने या वर्षाच्या आरंभी अफगाणिस्तानवर केलेल्या भीषण आक्रमणांचा संदर्भ देत पार्वतानेनी पुढे म्हणाले की, रमझानच्या पवित्र महिन्यात पाकने काबूलमधील एका रुग्णालयावर एक भीषण आक्रमण केले होते. हिंसेच्या या अमानवीय कृत्यात २६९ नागरिक ठार झाले. ही घटना कोणतेही सैनिकी लक्ष्य नसलेल्या ठिकाणी घडली. ती कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही. असे असतांनाही आंतरराष्ट्रीय कायद्यातील नियमांच्या तत्त्वांची भाषा करणे, हे पाकिस्तानचे ढोंगीपणाचे कृत्य आहे.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan