‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा !

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे गडहिंग्लज आणि शिरोळ येथे निवेदन

गडहिंग्लज येथे प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देतांना मंदिर महासंघाचे प्रतिनिधी आणि हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – हिंदु देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत धोक्यात आणणारा ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करावा, या मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने गडहिंग्लज आणि शिरोळ येथे देण्यात आले. गडहिंग्लज येथे प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देतांना मंदिर महासंघाचे गडहिंग्लज तालुका सहसंयोजक श्री. सुभाष चोथे, शिवसेनेचे श्री. संजय संकपाळ, धर्मप्रेमी श्री. राहुल खोत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. वामन बिलावर उपस्थित होते.

शिरोळ येथे तहसील कार्यालयात निवेदन देतांना मंदिर महासंघाचे प्रतिनिधी आणि हिंदुत्वनिष्ठ

शिरोळ येथे निवासी नायब तहसीलदार श्रीमती क्रांती पाटील यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघ सांगली जिल्हा समन्वयक श्री. संजय घाटगे, दत्त मंदिराचे प्रमुख विश्वस्त श्री. भगवंत जांभळे, सनातन संस्थेच्या साधिका अधिवक्त्या (सौ.) मनीषा माने, ‘स्वामी समर्थ संप्रदाया’चे श्री. रवींद्र महात्मे, वारकरी संप्रदायाचे श्री. विलास महात्मे, हिंदुत्वनिष्ठ श्री. विनायक सावंत आदी उपस्थित होते.