मुसलमानबहुल कोंढवा (पुणे) येथील लहान मुलांच्या वादावादीचे प्रकरण
रस्त्यावर ‘अल्ला हू अकबर’च्या (‘अल्ला महान आहे’ याच्या) घोषणा देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
(मॉब लिंचिंग म्हणजे जमावाकडून हत्या)
पुणे – येथील मुसलमानबहुल भाग असलेल्या कोंढव्यातील ‘ईशा बेला सोसायटी’मधील लहान मुलांच्या वादावादीचे प्रकरण समोर आले. येथील धर्मांध मुसलमान जमावाने रस्त्यावर उतरून एका हिंदु तरुणाचे ‘मॉब लिंचिंग’ करण्याचा प्रयत्न केला. जमावाने रस्ता रोखून वाहतूक कोंडी करण्याचाही प्रयत्न केला. रस्त्यावर येऊन घोेषणा करत परिसरात दहशत निर्माण केली. हा जमाव कोंढवा पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्यानंतर जमावाने पोलीस ठाणे आणि पोलीस यांवर दगडफेक केली. परिणामी पोलिसांनी दंगलखोरांवर लाठीमार करत जमाव पांगवला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आक्रमणकर्त्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम चालू केली आहे. ही घटना १८ मेच्या मध्यरात्री घडली.
Kondhwa, Pune: Attempted 'Mob Lynching' of Hindu Youth by fanatic mob, over a dispute between children in a Muslim-majority locality.
Slogans of “Nara-e-Takbir, Allahu Akbar” were raised to create fear and intimidation on the streets.
Is Pune in India or heading towards the… pic.twitter.com/dJKl22LTlC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 20, 2026
१. कोंढव्यातील ‘ईशा बेला सोसायटी’मध्ये एका कार्यक्रमाला लहान मुले आली होती. त्यांच्यात वाद होऊन त्यांनी एकमेकांना मारहाण केली. या वादावादीमध्ये मोठ्या लोकांनी हस्तक्षेप करत यास धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला.
२. जमाव रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण केला. त्या वेळी रस्त्यावरील काही लोकांनाही मारहाण करण्यात आली. ‘अल्लाहू अकबर’, ‘ला इलाहा इल्लल्लाह’ (अल्लाखेरीज अन्य दुसरा कुणी पूजनीय नाही) अशा घोषणा देऊन रस्ता अडवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
३. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आयुक्त अमितेशकुमार स्वत: घटनास्थळी आले होते.
४. सध्या कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने वातावरण शांत असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
आषाढी वारीमध्ये वारकर्यांना असुविधा न होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे ! – मंत्री जयकुमार गोरे
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !