नसरापूर येथील बालिका अत्याचार प्रकरण
१ सहस्र १०० पानांचे दोषारोपपत्र
पोलिसांकडून १४ दिवसांमध्ये दोषारोपपत्र प्रविष्ट

पुणे – नसरापूर (ता. भोर) येथील ४ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणार्या आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात १ सहस्र १०० पानांचे आरोपपत्र पोलिसांनी प्रविष्ट केले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुणे येथे या खटल्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले असून २१ मेपासून त्याची नियमित सुनावणी चालू होणार आहे. खटल्याचे गांभीर्य आणि पीडितेचे वय लक्षात घेऊन ही सुनावणी ‘इन कॅमेरा’ (बंद खोलीत) घेतली जाणार आहे.
१. ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली अन्वेषण पथकाने घटनेच्या १४ दिवसांत दोषारोपपत्र सादर केले.
२. सीसीटीव्ही चित्रीकरण, वैद्यकीय अहवाल आणि प्रत्यक्ष पुरावे याचा अंतर्भाव दोषरोपपत्रात आहे.
३. खटल्याच्या प्रारंभीस न्यायालयाने घटनास्थळाची पहाणी करावी, अशी विनंती सरकारी अधिवक्ता अजय मिसर यांनी न्यायालयास केली. खटल्याची सुनावणी दिलेल्या वेळेत पूर्ण केली जाईल. आरोपीला कठोर शिक्षा, पीडिता आणि तिचे कुटुंबीय यांना न्याय दिला जाईल, असा विश्वास अजय मिसर यांनी व्यक्त केला.
४. जिल्हा न्यायाधीश आणि विशेष सत्र न्यायाधीश एस्. आर्. साळुंखे यांच्या विशेष न्यायालयात कडक पोलीस बंदोबस्तामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !