मतदारसूचीतून रोहिंग्या किंवा बांगलादेशी घुसखोरांची नावे काढून टाकली पाहिजेत ! – Union Minister Kishan Reddy

केंद्रीय मंत्री किशन रेड्डी

नवी देहली – केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी नुकतेच सांगितले की, मतदारसूचीतून इतर सर्व देशांच्या नागरिकांची नावे काढून टाकली पाहिजेत. जर देशाच्या मतदारसूचीत रोहिंग्या किंवा बांगलादेशी व्यक्तीचे नाव आढळले, तर ते काढून टाकले पाहिजे. केवळ भारतीय नागरिकांचीच नावे या मतदारसूचीत राहिली पाहिजेत, असे  रेड्डी म्हणाले. (त्यासोबतच रोहिंग्या किंवा बांगलादेशी घुसखोरांची नावे मतदारसूचीत समाविष्ट करण्यास उत्तरदायी असलेल्या अधिकार्‍यांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)

१. सर्व राजकीय पक्षांनी ‘बूथ लेव्हल एजंट’ (बी.एल्.ए.) नियुक्त करावे आणि मतदारसूचीच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (एस्.आय.आर्.) प्रक्रियेच्या वेळी निवडणूक आयोगाला सहकार्य करावे, असे आवाहन रेड्डी यांनी केले.

२. जी. किशन रेड्डी यांनी भारतियांना असा विश्वास दिला आहे की, भाजपचे मतदानकेंद्र स्तरावरील कार्यकर्ते या सूचीविषयी निवडणूक आयोगाला पूर्ण सहकार्य करतील.