अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची चीन भेट आणि भारताची ‘तिहेरी घेराबंदी’ (Triple Encirclement)
बंगालपासून हिंदी महासागरापर्यंत विणला जात आहे नवा सापळा ! ज्यात ईशान्येला ‘ख्रिस्ती-इस्लामी स्टेट’साठीची ‘डीप स्टेट’ची उघड झालेली योजना, उत्तरेला चीन आणि पश्चिमेला पाकिस्तान असा हा मोठा सापळा रचला जात आहे. (डीप स्टेट म्हणजे सरकारी अधिकारी, सैन्याधिकारी, खासगी संस्था, अब्जाधीश उद्योगपती यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुप्त जाळे.) म्हणूनच भारत बंगालचा उपसागर-विशाखापट्टणम्-निकोबार असा एक अलिखित ‘कॉरिडॉर’ (सुसज्ज महामार्ग) निर्माण करत आहे, जेणेकरून उत्तर, वायव्य आणि ईशान्य या दिशांकडून होऊ घातलेली ही तिहेरी घेराबंदी समुद्राच्या बाजूने खुली राहील; पण त्या बाजूने चीनच्या आरमाराला कोणताही वाव रहाणार नाही. त्याचप्रमाणे चीनला या पट्ट्यात नाविक अन् गुप्तहेर यांच्या हालचालींना फार मोठी स्पर्धा असेल.

१. ‘आग्नेय दिशेला भारत सज्ज आहे का ?’, याची ब्रिटीश हवाई दलाच्या ‘एफ् ३५’ लढाऊ विमानाच्या माध्यमातून चाचपणी
समुद्राच्या बाजूने ही सज्जता अधिक महत्त्वाची का आहे, हे समजण्यासाठी गेल्या वर्षीच्या जून-जुलैमधील एक प्रसंग आठवावा लागेल. गेल्या वर्षी त्रिवेंद्रम्च्या सैनिकी विमानतळावर उतरवण्यात आलेल्या ब्रिटीश हवाई दलाच्या ‘एफ् ३५’ लढाऊ विमानाचा प्रसंग आठवा. ते विमान याचीच चाचपणी करायला आले होते की, भारताच्या आग्नेय बाजूने त्याची संरक्षण सिद्धता किती आहे ? म्हणूनच या सर्व जागतिक राजकारणाच्या धकाधकीत भारत किती सुसज्ज आहे, यावर देशाची जगातील उपयुक्तता, सैनिकी सिद्धता आणि त्याची पत सिद्ध होणार आहे. यावरून अमेरिका आणि चीन दोघांनाही हे लक्षात आले आहे की, आग्नेय दिशेला भारत सज्ज आहे. अन्यथा आलेले ब्रिटीश हवाई दलाचे ‘एफ् ३५’ लढाऊ विमान भारताच्या रडारवर दिसले नसते.
भारताच्या विरोधातील षड्यंत्र आणि नागरिकांनी देशाच्या बाजूने उभे रहाण्याचे महत्त्व
भारताची ईशान्य दिशा बंगाल विजयाने लष्करी आणि राजकीय दृष्टीने पुन्हा एकदा मजबूत होईल. नुकतीच मोदींनी जी चेतावणी दिली आहे, त्याचे महत्त्व जागतिक इंधन टंचाईच्या भीतीमुळे आहेच; पण सद्यःस्थितीत इंधन समस्येने ग्रस्त जगात या प्रभावाने काही प्रमाणात कमजोर भासत असलेल्या भारतावर जर काही लष्करी कारवाई किंवा तशा प्रकारचा राजकीय अथवा लष्करी दबाव निर्माण करायचा असेल, तर ही वेळ उपयुक्त आहे किंवा भारताला आर्थिक अन् लष्करी आघाडीवर गुंतवून देशांतर्गत मोदी विरोधकांचा उपयोग करून घेता येईल. म्हणूनच मोदींनी १४० कोटी जनतेला आवाहन केले आहे. मोदींची तीच एक पुष्कळ मोठी शक्ती आहे. या वेळी जनतेला प्रगल्भता दाखवून आतून आणि बाहेरून घेरू पहाणार्या या स्थितीत देशाच्या बाजूने ठाम उभे राहिले पाहिजे. मोदींच्या आवाहनाला वर मांडलेल्या या एकूण स्थितीत पुष्कळ महत्त्व आहे; कारण यापेक्षा अधिक स्पष्टपणे सांगता येणार नाही. आपल्याला समजून घ्यावे लागेल.
– प्रसन्न आठवले
२. अमेरिका आणि चीन एकमेकांचे शत्रू; पण त्यांचा सामायिक शत्रू भारत !
वायव्येकडील सिद्धता आपण ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कालावधीत अवघ्या ८४ घंट्यांत जगाला दाखवून दिली आहे. त्यामुळे ईशान्य भारत आणि नैऋत्य सागरी पट्टा हीच बाजू अशी आहे, जिथे चीन-अमेरिका काही करू शकतात; कारण आर्थिक जगतात आपण आता ५ व्या स्थानावर आहोतच; पण लष्करीदृष्टीनेही भारत आज जगात ४ थ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या सर्वांचा सर्वाधिक धोका अमेरिका आणि चीन या दोघांनाही आहे. एरव्ही जरी हे दोन्ही देश एकमेकांना पाण्यात पहात असले, तरीही जागतिक पटलावर दोघांचाही सामायिक शत्रू एकच आहे. तो म्हणजे भारत ! म्हणूनच भारताची घेराबंदी आणि नाकाबंदी हा मुख्य उद्देश अमेरिका अन् चीन यांच्यापुढे सध्या आहे.
३. देशाच्या ईशान्य बाजूला लष्करी तटबंदी उभारण्यासाठी भारत भक्कम हालचाली करण्याची शक्यता
त्यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात आणि विदेशातही कोणत्याही दबावाखाली न येता देशहिताच्या अनेक गोष्टी, अनेक प्रकल्प आणि अनेक योजना कार्यान्वित करत आहेत. अवघ्या १२ वर्षांत मोदींनी जी कामगिरी केली आहे, ती आज जगभरात चर्चेचा विषय आहे. अनेक जण देशाच्या प्रगतीने आणि वेगाने थक्क झाले आहेत; म्हणूनच इराण युद्धाच्या चर्चेसाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाठवणारे ट्रम्प मात्र तेवढ्याच कारणासाठी स्वतः चीनच्या दारात जाऊन उभे रहाणार नाहीत. भारत हा विषय आहेच खास. त्यातच ईशान्य बाजूची भारताची सज्जता आता बंगालपासून अरुणाचल प्रदेश, असा मोठा प्रदेश भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या हातात गेला आहे. त्यामुळे आता भारत त्या बाजूला काही मजबूत अशी लष्करी तटबंदी उभारेलच; पण या प्रदेशातील दुखर्या नसेलासुद्धा दुरुस्त करून आजपर्यंत काँग्रेसी काळात मुद्दाम दुर्लक्षित ठेवण्यात आलेल्या या संपूर्ण पट्ट्यात काहीतरी भक्कम हालचाली करणार, हे नक्कीच !
– प्रसन्न आठवले, परराष्ट्र धोरण अभ्यासक, पुणे.
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !