सुरत (गुजरात) येथे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात

सुरत (गुजरात) – शहरातील एका पीडित हिंदु महिला अधिवक्त्याने तिच्याच सहकारी अधिवक्त्यावर ओळख लपवून प्रेमसंबंध निर्माण करणे, लग्नाचे आमीष दाखवणे आणि शारीरिक शोषण करणे इत्यादी आरोप केले आहेत. पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने स्वत:चे नाव ‘रोहन’ असल्याचे खोटेच सांगून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.
१. पीडितेच्या म्हणण्यानुसार आरोपीने हिंदु धर्माप्रती गाढ श्रद्धा दाखवण्यासाठी धार्मिक उपक्रमांमध्ये भाग घेतला. त्यामुळे तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला.
२. महिला अधिवक्त्याचा आरोप आहे की, याच विश्वासाच्या जोरावर आरोपीने लग्नाचे आश्वासन दिले आणि अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले.
३. पीडित महिलेने लग्नासाठी दबाव टाकला, तेव्हा आरोपीने अचानक नकार दिला आणि सत्य समोर आले.
४. पीडित महिलेने आरोपीला विरोध केला आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने तिला मारहाण केली आणि जातीवाचक शिवीगाळ करून तिचा अपमान केला.
५. आरोपीचे आधीच दुसर्या महिलेशी लग्न झाले होते. ही माहिती मिळाल्यानंतर पीडितेला स्वतःची फसवणूक आणि शोषण झाल्याचे लक्षात आले. यानंतर महिलेने सुरतच्या चौक बाजार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.
बनावट चलनाद्वारे सातारा जिल्हा परिषदेची २८ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
महापालिकेच्या कर संकलन विभागाची २ कोटी ५७ लाख रुपयांची फसवणूक !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !