(म्हणे) ‘भारतासमवेतचे संबंध गंगा पाणी वाटप करारावर अवलंबून !’ – बांगलादेश

मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर

ढाका (बांगलादेश) – भारतासोबतच्या संबंधांचे भविष्य गंगा पाणी वाटप करारावर अवलंबून असेल, असे विधान बांगलादेशच्या सत्ताधारी ‘बी.एन्.पी.’ पक्षाचे सरचिटणीस आणि ग्रामीण विकास मंत्री मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी केले. भारत आणि बांगलादेश यांच्यात वर्ष १९९६ मध्ये झालेला गंगा पाणी वाटप करार याच वर्षी डिसेंबरमध्ये संपणार आहे. बांगलादेशसाठी गंगा नदी, जिला तिथे ‘पद्मा’ म्हणतात, शेती, जैवविविधता आणि पाणीपुरवठा या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

ढाका येथे आयोजित एका कार्यक्रमात आलमगीर म्हणाले की, बांगलादेश भारताला स्पष्ट संदेश देऊ इच्छितो की, नवीन करार बांगलादेशी जनतेच्या गरजा आणि हितानुसार असावा. जोपर्यंत नवीन करार होत नाही, तोपर्यंत सध्याचा करार चालू ठेवावा. भविष्यातील पाणी करार कोणत्याही निश्चित वेळेच्या मर्यादेत नसावेत, असेही त्यांनी सुचवले.

भारताने म्हटले आहे की, दोन्ही देशांमधील पाणी संबंधित सर्व सूत्रांवर स्थापित द्विपक्षीय यंत्रणेद्वारे नियमित चर्चा चालू आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेश अशी प्रकारे विधाने करून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लक्षात घेऊन भारतानेही बांगलादेशाला समजेल अशा भाषेत उत्तर देणे आवश्यक !