‘शास्त्र’ सदर : प्राचीन शास्त्र, सोप्या भाषेत
‘हिंदु पंचांगानुसार साधारणपणे ३ वर्षांच्या अंतराने अधिक मास येतो. याला ‘मल मास’, असेही म्हणतात. या वर्षी ज्येष्ठ मास अधिक आला आहे. अधिक ज्येष्ठ मास हा १७.५.२०२६ ते १५.६.२०२६ या कालावधीत आहे.
२. अधिक मासातील विहित (करता येणारी) कर्मे
अ. संध्या, अग्निहोत्र आणि नित्य देवपूजा
आ. अंत्यसंस्कार विधी, मृत्यूनंतरच्या १० व्या आणि १२ व्या दिवसांचे विधी अन् अशौच-निवृत्तीसाठी उदकशांती विधी
इ. गर्भिणी स्त्रीचे ‘पुंसवन, अनवलोभन, सीमंतोन्नयन आणि विष्णुबलि संस्कार (हे संस्कार गर्भाच्या रक्षणासाठी, दोष दूर करण्यासाठी आणि गर्भ निरोगी रहाण्यासाठी केले जातात. याविषयी आपण आगामी लेखांमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत.)
ई. नवजात शिशूचे जातकर्मापासून अन्नप्राशनापर्यंतचे सर्व संस्कार

३. वर्षश्राद्धाच्या संदर्भातील सूत्र
अ. मागील वर्षी ज्येष्ठ मासात ज्यांचे निधन झाले होते, त्यांचे पहिले वर्षश्राद्ध अधिक मासात संबंधित तिथीला करावे.
आ. दुसर्या वर्षापासूनचे नियमित वर्षश्राद्ध असेल, तर ते निज ज्येष्ठ मासात (१५.६.२०२६ ते १४.७.२०२६ या कालावधीत) संबंधित तिथीला करावे.’
(साभार : धर्मसिंधु)
– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा (२५.४.२०२६)
| ‘या लेखातील लिखाण आमच्या अल्पमतीनुसार आहे. यामध्ये विद्वानांना काही पालट सुचवायचे असल्यास अथवा अधिक माहिती उपलब्ध करून द्यायची असल्यास सनातन वेदपाठशाळेच्या ८१८०९६८६६० या क्रमांकावर संपर्क करावा’, ही नम्र विनंती !’
– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा (२५.४.२०२६) |

अहंकार कि सत्याचा शोध ?
गरम शेक आणि गार शेक
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !