मशिदींवरील भोंग्यांचा आवाज अल्प करण्याचे प्रकरण
काही पोलीस घायाळ
आसनसोल (बंगाल) – मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी राज्यातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचा आवाज मर्यादेत ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर येथे पोलिसांकडून त्यासंदर्भात तपासणी करण्याचा प्रयत्न केला जात असतांना धर्मांध मुसलमानांनी याला विरोध केला. मुसलमानांनी येथील जहांगीर मोहल्ला पोलीस चौकीला घेराव घालून ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) ‘नारा-ए-तकबीर’ (अल्ला सर्वांत मोठा आहे) या घोषणा दिल्या. या वेळी चौकीची तोडफोड करण्यात आली, तसेच मोठ्या प्रमाणात दगडफेकही करण्यात आली. यामुळे पोलिसांनी लाठीमार करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. ही घटना रेलपार येथे घडली. घटनेनंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून हिंसाचारात सहभागी असलेल्या काही मुसलमानांना अटक केली आहे. येथे शांतता राखण्यासाठी आणि अफवा पसरू नयेत; म्हणून तात्पुरत्या स्वरूपात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
🚨 Asansol (Bengal): A police outpost was vandalised by fanatic Islamist mobs opposing reduction of loudspeaker volume at mosques
Several police personnel were reportedly injured in the attack.
Slogans such as “Allahu Akbar” and “Nara-e-Takbeer” raised by the mob
The Police… pic.twitter.com/ayt1XHj8Pk
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 17, 2026
१. पोलीस प्रशासनाने राज्य सरकारच्या निर्देशानुसार आसनसोलच्या अनेक भागांमध्ये प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचा आवाज अल्प ठेवण्यास सांगितले होते. याच संदर्भात दिवसा रेलपार परिसरात पोलीस आणि स्थानिक मुसलमान यांच्यामध्ये चर्चा झाली होती. सायंकाळी मोठ्या संख्येने मुसलमान पोलीस चौकीवर पोचले. त्यांनी घोषणाबाजी करत चौकीवर दगडफेक केली. पोलीस आणि सामान्य लोक यांच्या वाहनांची तोडफोड केली. या घटनेत काही पोलीस घायाळ झाले.
२. या घटनेनंतर परिसरात अर्धसैनिक दल तैनात करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त व्ही.जी. सतीश पसुमार्थी म्हणाले की, आता परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणतीही समस्या नाही. सीसीटीव्ही चित्रीकरणाची ओळख पटवली जात आहे. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.

तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !
भाजपचे आमदार शंकर जगताप यांचे सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !