Kolkata Police Arrest : अंमलबजावणी संचालनालयाकडून कोलकाताच्या पोलीस उपाययुक्तांना अटक !

चौकशीसाठी उपस्थित न राहिल्याने कारवाई

पोलीस उपायुक्त शांतनू सिन्हा घोष

कोलकाता (बंगाल) – सोना पप्पू प्रकरणात अनेकदा समन्स बजावूनही चौकशीसाठी उपस्थित न राहिल्याने अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) कोलकाताचे पोलीस उपायुक्त शांतनू सिन्हा घोष यांना अटक केली.

त्यांना अनेकदा समन्स बजावूनही ते उपस्थित न झाल्याने त्यांच्याविरुद्ध ‘लूक-आउट नोटीस’ प्रसारित करण्यात आली होती. सोना पप्पू प्रकरण हे भूमी हडपणे, खंडणी मागणे आणि ‘रिअल इस्टेट’शी (मालमत्ता खरेदी-विक्रीशी) संबंधित आर्थिक फसवणूक, यांच्याशी संबंधित आहे.