महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश !

मुंबई, १५ मे (वार्ता.) – राज्याच्या महसूल विभागाकडून ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम’चा मसुदा प्रसारित केला असून याविषयी सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या अधिवेशनात हा कायदा आणणार असल्याचे वक्तव्य केले आहे; परंतु अधिनियमाविषयी राज्यातील मंदिरांच्या विश्वस्तांमध्येच असंतोष आहे. ‘देवस्थानांच्या ईनामी भूमींची विक्री करण्यात येऊ नये’, अशी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची भूमिका आहे. याविषयी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी १४ मे या दिवशी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मंदिरांच्या विश्वस्तांची भूमिका मांडली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यातील मंदिरांच्या विश्वस्तांची बैठक घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला 'महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६' हा कायदा मंदिरांच्या जमिनी व व्यवस्थापनासाठी अडचणीचा ठरणारा आहे. या कायद्याला राज्यातील लाखो मंदिर विश्वस्तांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री… pic.twitter.com/1idtkfyxR1
— Sunil Ghanwat 🛕🛕 (@SG_HJS) May 15, 2026

‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’चा प्रस्तावित कायदा रहित करा ! – ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी !
‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’चा प्रस्तावित कायदा रहित करावा, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राष्ट्रीय समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची १४ मे या दिवशी मंत्रालयात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. उपमुख्यमंत्र्यांनीही महसूल मंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
मंदिर विश्वस्तांची भूमिका समजून घेणार ! – महसूलमंत्री
राज्याच्या महसूल विभागाकडून ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम’चा मसुदा प्रसारित केला असून याविषयी सूचना आणि हरकती ५ जूनपर्यंत मागवण्यात आल्या आहेत. या कायद्याद्वारे मंदिरांच्या भूमीची विक्री होणार असल्यामुळे राज्यातील मंदिरांच्या विश्वस्तांमध्ये या अधिनियमाविषयी असंतोष आहे. त्यामुळे मंदिर विश्वस्तांची भूमिका सरकारने जाणून घ्यावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने राष्ट्रीय समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. यावर २१ मे या दिवशी राज्यातील मंदिरांच्या विश्वस्तांसवमेत बैठक घेण्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिले आहे. १४ मे या दिवशी सुनील घनवट यांनी मंत्रालयामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन ही मागणी केली.
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक