
तुमकूरू (कर्नाटक) – येथील मदरशात मौलवीच्या सततच्या छळाला कंटाळून तेथून पळून आलेली २४ मुसलमान मुले बेंगळुरू रेल्वे स्थानकावर सापडली. बिहारमधून ही मुले तुमकूरू येथील अमलापूर येथील ‘जामिया अरेबिया हसीनिया ट्रस्ट’ मदरशात शिकण्यासाठी आली होती. मौलवीच्या विरोधात बाल न्याय कायदा आणि बालमजुरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत.
संशयास्पदरित्या फिरणार्या या मुलांना पाहून रेल्वे सुरक्षा दलाने त्यांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. मदरशाचा मौलवी इतका क्रूर होता की, तो शिकायला आलेल्या मुलांकडून दगड वाहून नेण्याची कामे करून घेत असे, असा आरोप मुलांनी केला आहे. प्रतिदिन दगड-माती वाहायला लावली जात असे. काम करायला नकार दिल्यास मौलवी त्यांना बेदम मारहाण करून त्यांचा छळ करत असे. अनेकदा मुलांना नीट जेवणही दिले जात नव्हते, असाही आरोप आहे. शारीरिक अत्याचार, छळ आणि सक्तीच्या मजुरी यांना कंटाळून शेवटी ही मुले तिथून पळून आली.
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
दौंड (पुणे) येथे नकली मद्य सिद्ध करणार्या चौघांना अटक !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा