![]()
१. वाटणे आणि विभाजन करणे यांच्यातील भेद
‘आपल्या देशामध्ये २ प्रकारचे विचार अधिक संघर्षशील आहेत. ‘बांट दो और बांट दो’ हे शब्द दिसायला एकसारखेच वाटतात; परंतु त्यांचे अर्थ निरनिराळे आहेत. मांजर उंदराला ज्या दातांनी पकडते, त्याच दातांनी ती तिच्या पिल्लांनाही पकडते; पण त्या दोन्ही पकडण्यात तिचा भाव निरनिराळा असतो. मांजर तिच्या पिल्लांच्या मानेला दाताने पकडून अलगद उचलून नेते, तर उंदराला पकडतांना त्याला खाण्यासाठी तेच दात खुपसून मारते. ‘वाटणे (बांट दो)’ हा एक भाव आहे आणि ‘फूट पाडा (बांट दो)’, हा दुसरा भाव आहे. ‘देशात स्वत:जवळील वाटून टाका’, असे सांगणारे संत स्वभावाचे लोक आहेत आणि ‘फूट पाडून स्वार्थ साधणारे’, असे प्रयत्न करणारेही लोक आहेत.
|
श्री. पवन द्विवेदी यांचा परिचय जालौन, उत्तरप्रदेश येथील श्री. पवन द्विवेदी यांच्या भागात धर्मांधांची दहशत अत्युच्च सीमेवर पोचली आहे. अशा स्थितीत त्यांनी त्यांच्या ३ भावांसह चित्रकूटमध्ये देवी मंदाकिनीसमोर ‘आम्ही जीवनभर अविवाहित राहून केवळ धर्मकार्यच करणार !’, अशी शपथ घेतली. उत्तरप्रदेशमध्ये विनाअनुमती चालणारी अनधिकृत दुकाने, वस्त्या आणि पशूवधगृहे आहेत. या सर्वांच्या विरोधात ते कठोर संघर्ष करत आहेत. |
२. जालौन येथे कसायांच्या ४५० घरांवर १ कोटी ८२ लाख रुपयांचा दंड
जालौन तालुक्यात ८० टक्के मुसलमान समाज रहातो. त्यांच्या कुरेशी समाजाने येथील संपूर्ण तलावाच्या सभोवती मोठमोठ्या इमारती उभ्या करून अतिक्रमण केले. तेथे सर्वांत मोठ्या प्रमाणात गोमांस विक्री करणारा कसाई रहात होता. तो गोहत्या केल्यावर त्याच तलावात गायींचे अवशेष टाकत होता. अशा प्रकारे अवशेष टाकणे आणि उभारलेल्या अतिक्रमित इमारती, हे दोन्ही जलप्रदूषणाच्या कायद्याच्या विरोधात होते. त्याविरोधात आम्ही ‘राष्ट्रीय हरित प्राधिकरणा’मध्ये खटला भरला. त्यानंतर प्राधिकरणाच्या आदेशानुसार तेथील अनुमाने ४५० घरांवर प्राधिकरणाने १ कोटी ८२ लाख रुपयांचा दंड ठोठावला. या कालखंडात जालौन तालुक्यात वर्ष २०११ बॅचचा मन्नारख्खा नावाचा जिल्हाधिकारी होता. त्याच्या गुणसूत्रातच (‘डी.एन्.ए.’मध्ये) जिहादी कारवाया ठासून भरलेल्या होत्या. तो त्याच्या अधिकाराचा दुरुपयोग करून सतत हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा. त्याच्या समाजाची घरे पाडल्यावर त्याचा जळफळाट झाला. त्याने आम्हा हिंदुत्वनिष्ठांवर दबाव निर्माण करून त्रास देण्याचा प्रयत्न केला; पण महादेवाच्या कृपेने आमचे रक्षण झाले.
|
आपण हिंदु जनजागृती समितीशी जोडले गेलो, तर मनातील भय नष्ट होईल ! ‘हिंदु जनजागृती समिती’ची निवड जणू परमात्म्यानेच केली आहे. आपल्यात दडलेली देशभक्तीची प्रतिभा बाहेर काढण्याचे आणि तिला चारही दिशांमध्ये प्रसारित करण्याचे कार्य समिती करत आहे. जेव्हा एखादी देशविरोधी शक्ती कार्यरत असते, तेव्हा आपल्याला बाहेरहून घरात अधिक सुरक्षित वाटत असते; कारण आपल्या मनामध्ये कसले तरी अनामिक भय दडलेले असते; परंतु आपण खर्या अर्थाने निर्भय होऊन कार्य करणार्या हिंदु जनजागृती समितीशी जोडले गेलो, तर आपल्या मनातील भय निश्चितपणे नष्ट होईल. हिंदु जनजागृती समिती ही सर्वांना एकमेकांशी जोडत आहे. सर्वांमध्ये समन्वय वाढवत आहे आणि त्या सर्वांची शक्ती कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करत आहे. मुसलमानांचे लांगूलचालन करणारे जन्माने हिंदु असलेले राजकीय नेते मोठा सहभाग घेतात. येथेच हिंदूंचा सर्वधर्मसमभाव नडतो. ‘ते कसे का वागेनात, आपण त्यांच्याशी चांगले वागूया’, या मनोवृत्तीमुळे धर्मांधांचे आणखी फावते. ते आणखी अत्याचार करतात. उद्या आपल्यावरही ही वेळ येऊ शकते, हे प्रत्येक हिंदूने लक्षात घेऊन धर्मांध आक्रमकांचा प्रतिकार करण्यासाठी संघटित झाले पाहिजे !’ |
३. न्यायालयाकडून सरकारी गोशाळांना दंड
उत्तरप्रदेशात ४०० सरकारी गोशाळा आहेत. गोशाळांच्या व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळें प्रतिवर्षी किमान ३० सहस्रांहून अधिक गोवंशियांचा मृत्यू होत होता. त्यासाठी मी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडे अर्ज केला. त्या सरकारी गोशाळांवर न्यायालयाने अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला, तसेच जिल्हा व्यवस्थापनाला कठोर आदेश दिले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने येऊन गोशाळेतील परिस्थिती पाहिली. आता तेथील गोशाळेत पुष्कळ सुधारणा झाल्या आहेत.’
– श्री. पवन द्विवेदी, जालौन, उत्तरप्रदेश.
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !