३०.४.२०२६ या दिवशी पुणे येथील श्रीमती प्रभावती चंद्रकांत मेहता (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ९३ वर्षे) यांचे निधन झाले. १२.५.२०२६ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता (श्रीमती प्रभावती मेहता यांचा मुलगा, वय ७० वर्षे), पुणे
१ अ. आईला कोणताही आजार नसणे आणि तिला शांतपणे मृत्यू येणे : ‘माझी आई श्रीमती प्रभावती मेहता हिला कोणताही आजार नव्हता. वयोमानामुळे तिचे अवयव शिथिल झाल्यामुळे तिला मृत्यू आला. तिचा मृत्यू सुखकारक व्हावा; म्हणून मी महामृत्युंजय मंत्र लावून ठेवला होता. त्यामुळे तिचा त्रास न्यून होऊन तिला शांतपणे मरण आले.

१ आ. ‘तिचा प्राण डोळ्यांतून गेला’, असे मला जाणवले.
१ इ. मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे
१. घरात कोणताही दाब जाणवत नव्हता.
२. ‘घरातील चैतन्यात वाढ झाली आहे’, असे मला जाणवत होते.
३. वातावरणात उष्णता पुष्कळ असतांनाही घरात थंडावा जाणवत होता.
४. दुसर्या दिवशी सकाळी आईचे अंत्यविधी करण्यात आले. त्या वेळी ‘तिचा चेहरा तेजस्वी झाला आहे’, असे मला जाणवत होते.
५. अंत्यविधीनंतर ‘घरात असलेल्या तिच्या छायाचित्रातील चैतन्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे’, असे मला जाणवते.
६. ती ज्या पलंगावर झोपायची, त्या पलंगावर बसल्यावर माझा नामजप तीव्रतेने होतो आणि माझे ध्यान लागते.
‘ईश्वराने आईला ९३ वर्षांचे सुदृढ आयुष्य दिले आणि तिच्याकडून सर्व प्रारब्ध भोगून घेऊन तिला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त केले’, याबद्दल मी गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
२. सौ. अंजली मेहता (श्रीमती प्रभावती मेहता यांची मुलगी, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६८ वर्षे), सातारा रस्ता, पुणे.
२ अ. आईचा नामजप शेवटपर्यंत चालू असणे : ‘३०.४.२०२६ या दिवशी सकाळपासूनच आईला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. सकाळी १० वाजल्यापासून मी तिच्या जवळ भ्रमणभाषवर नामजप लावून ठेवला, तसेच तिला सहज दिसेल अशा ठिकाणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र ठेवले. नामजप लावल्यावर तिच्या हातांच्या बोटांच्या हालचालीवरून ‘ती नामजप ऐकत आहे’, असे मला जाणवत होते. ‘प्राण जाईपर्यंत आईचा नामजप चालूच होता’, असे मला जाणवले.
२ आ. मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे
१. आईकडे पाहिल्यावर ‘ती शांत झोपली आहे’, असे जाणवत होते.
२. आई नेहमी ज्या पलंगावर झोपायची, तेथे बसल्यावर माझा नामजप एकाग्रतेने होतो आणि ‘चैतन्य मिळते’, असे मला जाणवते.
‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला हे अनुभवता आले’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
| आजी, तू केलीस सदैव मायेची पखरण । चेहर्यावरचे हसू तिचे कधी न्यून झाले नाही । आणि तिच्या घरी आलेला पाहुणा रिकामा कधी गेला नाही ।। १ ।।अतिशय कष्टाळू, प्रेमळ आणि सुगरण । आम्हा सगळ्यांवर केली सदैव मायेची पखरण ।। २ ।। साईबाबा आणि परम पूज्यांवर (टीप) होती अढळ श्रद्धा । आज तुझ्या आठवणीने मन ओथंबून आले । टीप – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
३. सौ. नेहा मेहता (श्रीमती प्रभावती मेहता यांची नातसून, मुलीची सून), पुणे
३ अ. आजींच्या मृत्यूच्या काही मास आधी त्यांच्याकडे पाहून ‘त्यांच्या अंतरात्म्याला आपले बोलणे समजत आहे’, असे जाणवणे : ‘काही मासांपूर्वी आजीला जेवण देण्याच्या निमित्ताने मी तिला भेटायला गेले होते. तेव्हा आजीकडे पाहून ती आमच्यामध्ये असूनही नसल्यासारखी जाणवत होती. आजीचे बोलणे कुणालाही कळत नसे. त्यामुळे तिच्याशी संवादही साधता येत नसे, तरी त्या दिवशी आजीकडे पाहून ‘तिच्या अंतरात्म्याला आपले बोलणे समजत आहे’, असे मला जाणवले.’
४. सौ. अनुराधा तागडे (श्रीमती प्रभावती मेहता यांच्या नातीच्या सासूबाई, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७० वर्षे), पुणे
४ अ. आजींची गुणवैशिष्ट्ये
१. ‘आजी सतत आनंदी असायच्या.
२. त्यांनी घरी येणार्या कुणालाही खाऊ दिल्याविना कधी पाठवले नाही.
३. आजींना त्यांची चारही मुले आणि सुना यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नव्हती.
४. त्यांना कशाचीच आसक्ती नव्हती.
४ आ. मृत्यूपूर्वी जाणवलेले सूत्र : आजींचे निधन होण्याच्या काही मास आधी मी त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा त्यांच्याकडे पाहून ‘त्या अखंड अनुसंधानात आहेत आणि आता त्या विरक्त झाल्या आहेत’, असे मला जाणवले.
४ इ. मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे
१. वातावरणात हलकेपणा होता.
२. अंत्यविधीच्या वेळी आजींचा देह तिरडीवर ठेवला. त्या वेळी ‘त्यांच्या देहाभोवती चैतन्याचे वलय निर्माण झाले आहे’, असे मला जाणवले.
३. आजींच्या निधनानंतर ६ दिवसांनी मी पुन्हा त्यांच्या घरी गेले होते. तेथे त्यांच्या छायाचित्राकडे पाहून मला पुष्कळ तेज आणि चैतन्य जाणवले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ७.५.२०२६)
– सौ. नीलम शहा (श्रीमती प्रभावती मेहता यांची नात, मुलीची मुलगी), ठाणे (६.५.२०२६)
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
देश दुर्दशेला पोचण्यामागे हे आहे कारण !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !