हापूड (उत्तरप्रदेश) – येथे देहरा गावात महाराणा प्रताप जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मुसलमानांकडून दगडफेक करण्यात आली. यात अनेक जण घायाळ झाले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या हिंदूंनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. यामुळे परिसरात मोठा संघर्ष निर्माण झाला. हिंदूंच्या आक्रमक पवित्र्यासमोर दगडफेक करणार्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. हिंदूंच्या जोरदार प्रतिकारानंतर दंगलखोर जीव वाचवण्यासाठी पळतांना दिसले. या धुमश्चक्रीत प्रत्युत्तर देणार्या जमावाने काही दंगलखोरांना पकडून चांगलाच चोप दिला.
Stone-pelting by Muslims on Maharana Pratap Jayanti procession in Hapur (Uttar Pradesh) – Hindus retaliate.
Even with Yogi Adityanath's government – which takes strict action, the audacity of fanatics to attack Hindus does not diminish; this highlights the extent of the… pic.twitter.com/2wEu6MwFwP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 11, 2026
१. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या हिंसाचाराला उत्तरदायी असणार्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
२. या प्रकरणी आतापर्यंत २ जणांना अटक करण्यात आली आहे. दगडफेक करणार्या इतरांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. पोलिसांनी मिरवणुकीचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केले होते, त्या चित्रीकरणाच्या आधारे दोषींचा शोध घेतला जात आहे.

प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले