
पुणे – नसरापूर परिसरात १ मे या दिवशी ६५ वर्षीय भीमराव कांबळे याने ४ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या अमानवीय अत्याचाराच्या निषेधार्थ १० मे या दिवशी एका शांततामय मेणबत्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. निषेध नोंदवणे, खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा होण्याची मागणी करणे आणि पीडितेला न्याय मिळवून देणे यांसाठी ‘समस्त पुणेकर नागरिक’ अन् विविध सामाजिक संस्था यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सायंकाळी ६ वाजता बालगंधर्व चौक येथून चालू होईल आणि डेक्कन येथील ‘सावरकर स्मारक’ येथे त्याची सांगता होईल. समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन येथील पत्रकार परिषदेत आयोजकांनी केले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ लेखिका सौ. शेफाली वैद्य अन्य मान्यवरांसह उपस्थित होत्या.
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
राज्यातील १०३ विधी महाविद्यालयांना ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ची मान्यता नाही !
दौंड (पुणे) येथे नकली मद्य सिद्ध करणार्या चौघांना अटक !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश