स्वतंत्र देश मागणार्यांनी ३ लाख स्वाक्षर्या गोळा केल्या
ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये खलिस्तान समर्थक शिखांकडून भारतातील पंजाबला स्वतंत्र ‘खलिस्तान’ देश घोषित करण्यासाठी नेहमीच जनमत संग्रह करण्याचा प्रयत्न केला जात असतो. आता कॅनडामध्येच त्यांच्या पश्चिम प्रांतातील अल्बर्टाला वेगळा देश बनवण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. फुटीरतावाद्यांनी दावा केला आहे की, त्यांनी इतका पाठिंबा मिळवला आहे की, आता स्वातंत्र्यावर जनमत संग्रह (रेफरेंडम) घेतला जाऊ शकतो. त्यांनी अनुमाने ३ लाख स्वाक्षर्या निवडणूक अधिकार्यांकडे सोपवल्या आहेत, तर यासाठी १ लाख ७८ सहस्र स्वाक्षर्यांची आवश्यकता होती. या प्रक्रियेवर सध्या न्यायालयाच्या आदेशामुळे बंदी घालण्यात आली आहे. जर मतदान अल्बर्टाच्या बाजूने झाले, तर हा प्रांत कॅनडापासून तुटून वेगळा देश बनू शकतो.
अल्बर्टा येथे अनुमाने ५० लाख लोक रहातात, दीर्घकाळापासून तो स्वतःला कॅनडापासून वेगळे मानतो. अल्बर्टा हे तेल आणि वायू यांनी समृद्ध असे राज्य आहे. येथे कॅनडाच्या एकूण तेल उत्पादनाचा अनुमाने ८४ टक्के हिस्सा काढला जातो. येथील लोकांना वाटते की, ते अधिक कमावतात; परंतु त्याचा लाभ उर्वरित कॅनडाला अधिक मिळतो. त्यांची तक्रार आहे की, कराचा पैसा ओटावामध्ये जाऊन खर्च होतो; परंतु निर्णय घेतांना मात्र त्यांचे म्हणणे अत्यल्प प्रमाणात ऐकले जाते. त्यांची संस्कृती, अर्थव्यवस्था आणि राजकारण वेगळे आहे; परंतु निर्णय ओटावामध्ये बसून घेतले जातात.

France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड
Attack On Ship : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय व्यापारी नौकेवर आक्रमण : ११ पैकी १ कर्मचारी बेपत्ता