Bareilly Gym Scandal : बरेलीच्या ‘जिम’मध्ये अक्रम आणि आलम यांच्याकडून हिंदु महिला डॉक्टरवर बलात्कार !

  • बरेली (उत्तरप्रदेश) येथे ‘जिम जिहाद’चे प्रकरण उजेडात

  • नग्न व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत ५० लाख रुपयांची केली मागणी !

बरेली (उत्तरप्रदेश) – बरेलीमध्ये ‘अल्टिमेट फिटनेस जिम’चा मालक अक्रम बेग आणि त्याचा भाऊ आलम बेग यांनी एका सुशिक्षित हिंदु महिला डॉक्टरला त्यांच्या जाळ्यात अडकवून त्या डॉक्टरवर बलात्कार केल्याचे उघड झाले. तसेच त्यांनी त्या महिला डॉक्टरचे नग्न व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत पीडित डॉक्टरकडून लाखो रुपये उकळले. २ वर्षे छळ आणि पैशांची लूट सहन केल्यानंतर त्या महिला डॉक्टरने धाडस दाखवून पोलिसांकडे धाव घेतली. त्यामुळे अक्रम बेग आणि त्याचा भाऊ आलम बेग यांचा घृणास्पद कट उघड झाला.

१. बरेलीच्या नागरी भागातील ‘सिव्हिल लाइन्स’मध्ये ‘अल्टिमेट फिटनेस जिम’ गेल्या १० वर्षांपासून चालू होती. शहरातील प्रतिष्ठित महिला व्यायामासाठी येथे येत असत. यामध्ये अनुमाने ८० हिंदु महिला होत्या. जिमचा मालक अक्रम बेग याने एका ४० वर्षीय हिंदु महिला डॉक्टरला वजन लवकर अल्प करण्याचे आमीष दाखवले.

२. एका सुनियोजित कटाच्या अंतर्गत अक्रम बेग त्या डॉक्टरला प्रतिदिन व्यायामापूर्वी एक खास पेय पाजत असे. तो गुपचुप त्या पेयात गुंगीचे औषध मिसळत असे. पेय पिताच जेव्हा डॉक्टर बेशुद्ध होऊ लागत, तेव्हा अक्रम बेग त्यांना जिमच्या एका कोपर्‍यात असलेल्या गुप्त खोलीत घेऊन जात असे. तेथेच त्याने एके दिवशी डॉक्टरवर बलात्कार केला. या गुन्ह्यात अक्रमचा भाऊ आलम देखील पूर्णपणे साथ देत असे.

३. या आरोपींचा उद्देश केवळ डॉक्टरवर बलात्कार करण्यापुरता नव्हता, तर त्यांनी याला पैसे कमवण्याचे साधन बनवले होते. जिमच्या त्या गुप्त खोलीत अक्रम डॉक्टरसमवेत चुकीचे कृत्य करायचा, तेव्हा त्याचा भाऊ आलम अश्लील व्हिडिओ बनवत असे.

४. पीडित डॉक्टरला या गोष्टीची माहिती मिळाली आणि त्यांनी जिममध्ये जाणे बंद केले,  तेव्हा अक्रमने त्याचे खरे रूप दाखवले. त्याने डॉक्टरला त्यांचे नग्न व्हिडिओ दाखवले आणि गप्प बसण्याच्या बदल्यात १० लाख रुपये मागितले. डॉक्टर इतक्या घाबरल्या की, त्यांनी ८० सहस्र रुपये दिले; पण अक्रमचा हाव वाढतच गेला. त्याने नंतर ५० लाख रुपये मागितले आणि धमकी दिली की, जर पैसे मिळाले नाहीत, तर तो व्हिडिओ इंटरनेटवर प्रसारित करेल आणि त्यांच्या पती आणि मुलांना मारून टाकेल.

५. हिंदु महासभेच्या नेत्यांनी याला ‘जिम जिहाद’ म्हटले आहे. जिम चालवण्याच्या नावाखाली हिंदु महिलांना अडकवले जात होते, असा आरोप त्यांनी केला आहे.

६. पीडितेच्या तक्रारीनंतर दोन्ही आरोपी अक्रम बेग (४७) आणि आलम बेग (३५) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी जिमची झडती घेतली, तेव्हा तेथून अश्लील व्हिडिओ, अमली पदार्थ, शक्ती वाढवणारी औषधे, इंजेक्शन आणि सुया जप्त करण्यात आल्या.

७. पोलिसांना संशय आहे की, अक्रम आणि त्याच्या भावाने अशा अनेक हिंदु महिलांना आपल्या जाळ्यात अडकवले असेल, ज्या अपकीर्तीच्या भीतीने गप्प बसल्या आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

८. याआधीही विविध राज्यांमधून ‘जिम जिहाद’मध्ये मुसलमानांकडून हिंदु महिलांना जाळ्यात अडकवण्याचे प्रकार घडले आहेत.

संपादकीय भूमिका

  • लव्ह जिहाद, लँड जिहाद, कॉर्पाेरेट जिहाद, जिम जिहाद आदींची वाढती प्रकरणे पहाता धर्मांधांच्या सर्व व्यावसायांवर समाजाने बहिष्कार घातल्यास आश्चर्य वाटू नये !
  • उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे शासन असून आणि तेथे लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध मुसलमान त्यांना जराही जुमानत नसल्याचे दिसून येते ! यावरून उत्तरप्रदेशमधील लव्ह जिहादविरोधी कायदा किती तकलादू आहे ?, हेच लक्षात येते !
  • अशा घटनांविषयी एकाही राजकीय पक्षाचे नेते कधी तोंड उघडत नाहीत आणि हिंदूंना वाचवण्याचे आश्वासन देत नाहीत, हे लक्षात घ्या !