
वॉशिंग्टन (अमेरिका) – अश्लील साहित्य आणि समलैंगिकतेशी संबंधित आशय प्रतिबंधित करण्यासाठी अमेरिकेत एक नवीन ‘येशू-केंद्रित’ (Jesus-centric) ‘ख्रिस्ती मोबाईल नेटवर्क’ चालू करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे ‘नेटवर्क’ ख्रिस्ती मूल्यांचे पालन करणार्या ग्राहकांसाठी निर्माण करण्यात आले आहे. या नवीन ‘टेलिकॉम’ सेवेचे नाव ‘किंगडम मोबाईल’ असे असून हे ‘नेटवर्क’ वापरकर्त्यांना ‘स्वच्छ आणि सुरक्षित’ इंटरनेटचा अनुभव देण्याचे आश्वासन देत आहे. आस्थापनाच्या मते, हे नेटवर्क अशा सर्व गोष्टींची पडताळणी करेल, ज्या ख्रिस्ती धर्माच्या शिकवणुकीच्या विरोधात आहेत.
‘Jesus-centric’ Christian mobile network launched in the US to block pornographic & #LGBTQ content 📵#RadiantMobile partnered with Israeli cybersecurity firm Allot, which uses 100+ categories to automatically restrict adult material.#Technology pic.twitter.com/kVNqMd8w2f
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 8, 2026
या निर्णयामुळे अमेरिकेत वादाला तोंड फुटले आहे. अनेकांनी याला ‘सेन्सॉरशिप’ आणि मानवी अधिकारांचे उल्लंघन म्हटले आहे, तर दुसरीकडे पुराणमतवादी ख्रिस्ती समुदायातील काही गटांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. सध्या हे ‘नेटवर्क’ अमेरिकेतील काही राज्यांमध्ये चालू करण्याची योजना असून भविष्यात त्याचा विस्तार केला जाऊ शकतो.
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !