Pakistan Afghanistan War : पाक सैन्याच्या आक्रमणात ३ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अफगाणिस्तानचा आरोप पाकने फेटाळला !

आक्रमणात २ मशिदी, २ शाळा झाल्या होत्या उद्ध्वस्त

प्रातिनिधिक छायाचित्र

काबुल (अफगाणिस्तान) – पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पूर्व कुनार प्रांतात आक्रमण केले. यात २ शाळा, २ मशिदी आणि १ आरोग्य केंद्र उद्ध्वस्त झाले. यात ३ जणांचा मृत्यू झाला, तर १४ जण घायाळ झाले, असा दावा अफगाणिस्तानने केला; मात्र पाकने हा दावा फेटाळून लावला.

पाकिस्तानचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तानचे हे दावे नुकत्याच अफगाण सीमेतून पाकिस्तानच्या दिशेने झालेल्या गोळीबाराची घटना लपवण्यासाठी केले जात आहेत. पाकिस्तानच्या मते, मार्च आणि एप्रिल महिन्यांमध्ये अफगाण सीमेवरून झालेल्या आक्रमणांमध्ये खैबर पख्तूनख्वातील बाजौर जिल्ह्यात ९ महिला आणि मुले ठार झाली होती.