‘झेविअर’सारख्या क्रूरकर्म्यांच्या नावाच्या शाळा बंद करण्याची मागणी !

सांगली, ४ मे (वार्ता.) – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि देशभक्त गौतम खट्टर यांना गोवा येथे झालेली अटक अत्यंत लज्जास्पद आहे. फ्रान्सिस झेविअर हा केवळ क्रूरकर्मा नसून देशाचा शत्रू होता. अशा व्यक्तीचा इतिहासामध्ये ‘देशद्रोही आणि धर्मद्रोही’ म्हणूनच उल्लेख व्हायला हवा, असे विधान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी येथे केले होते. ‘खट्टर यांची तात्काळ सुटका करण्यात यावी’, अशी मागणीही त्यांनी त्या वेळी केली होती.
🚨 The arrest of patriot @GautamKhattar in Goa is shameful – Pujya Sambhajirao Bhide Guruji
Demands the closure of educational institutions named after "cruel" figures like Francis Xavier
After bail, Gautam Khattar visited Sangli to seek Guruji’s blessings
Stopping the… https://t.co/EMlTOR423c pic.twitter.com/IDLWXoybiT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 5, 2026
पू. भिडेगुरुजी म्हणाले,
‘‘फ्रान्सिस झेविअरने गोव्यात केलेले धर्मांतर आणि अत्याचार यांचा इतिहास लपवून त्याला ‘संत’ म्हणणे चुकीचे आहे. इतिहासातील त्याचा उल्लेख ‘देशद्रोही’ असाच असायला हवा आणि तसाच इतिहास पुढच्या पिढ्यांना शिकवला गेला पाहिजे. झेविअरच्या नावाने चालवल्या जाणार्या शाळा म्हणजे उघडपणे देशद्रोहच आहे. अशा शाळांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी.’’
देशभक्त गौतम खट्टर यांनी घेतले पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे आशीर्वाद !

देशभक्त गौतम खट्टर यांना जामीन मिळताच त्यांनी सांगली येथे येऊन गुरुवर्य पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी विविध मान्यवर आणि धारकरी उपस्थित होते.
Fake Currency Racket : कर्नाटक : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !