‘एआय मॉडेल्स’च्या सुरक्षा कवचांवर (धोकादायक उत्तरांवर लगाम लावण्यावर) प्रश्नचिन्ह उपस्थित !

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेतील प्रथितयश ‘स्टॅनफर्ड विद्यापिठा’चे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. डेव्हिड रलमॅन यांनी एआयद्वारे मिळत असलेल्या मानवविघातक माहितीविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांना एका ‘एआय टूल’ने जैविक शस्त्रे कशी बनवायची ?, याविषयी सविस्तरपणे माहिती दिली. थोडक्यात सामूहिक नरसंहाराची संपूर्ण योजना कशी सिद्ध करायची, याविषयी एआयने त्यांना सांगितल्यावरून ते अक्षरश: हादरले. रलमॅन यांना एका एआय आस्थापनाने त्यांचा ‘एआय चॅटबॉट’ (एआय प्रणाली) प्रसारित करण्याआधी ‘तो योग्य प्रकारे सुरक्षित उत्तरे देतो का ?’, यासाठी नियुक्त केले होते. या वेळी चॅटबॉटने केवळ विघातक रोगजनकाला प्रयोगशाळेत कशा प्रकारे पालटले, तर त्यावर सध्याची औषधे निष्प्रभ ठरतील, एवढीच माहिती दिली नाही, तर त्याने मोठ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर त्याचा प्रयोग करून अधिकाधिक लोकांचा जीव कसा घेता येईल, याचेही सविस्तर वर्णन रलमॅन यांनी त्याला विचारलेले नसतांनाही दिले. ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने हे वृत्त प्रसारित केले आहे.
🚨 Human-Destructive AI? Serious Questions Raised
An AI model reportedly revealed a complete method for creating biological weapons to scientists ⚠️
This raises alarming concerns about the safety guardrails of advanced AI systems – are they truly effective in preventing… pic.twitter.com/AV9bNwHWlK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 5, 2026
सध्याचे ‘एआय मॉडल्स’ विनाशकारी उत्तरे देत असल्याची काही उदाहरणे !
१. डॉ. डेव्हिड रलमॅन यांनी सांगितले की, मी विचारही करू शकत नाही, अशा प्रकारे ते ‘एआय चॅटबॉट’ मला अत्यंत ‘चालाकी’ आणि ‘धूर्तता’ यांनी उत्तरे देत होता.
२. थोडक्यात, ‘जेमिनी’, ‘चॅटजीपीटी’ आणि ‘अँथ्रोपिक’ यांसारखी ‘एआय मॉडल्स’ धोकादायक माहिती देण्यास सक्षम आहेत.
३. जगात अग्रक्रमावर असलेल्या ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे वैज्ञानिक केविन एसवेल्ट यांनी सांगितले की, ‘चॅटजीपीटी’ने जैविक शस्त्रे फवारण्याची योजना आखली, जेणेकरून ती एका मोठ्या फुग्याद्वारे कोणत्याही अमेरिकी शहरावर फवारली जाऊ शकतील.
४. ‘गूगल जेमिनी’ने अशा रोगजनकांची सूची दिली, जे मांस उद्योगाला मोठी हानी पोचवू शकतात.
५. ‘अँथ्रोपिक क्लाऊड’ने नवीन विषारी पाककृती सादर केली.
६. गूगलच्या ‘डीप रिसर्च’ला एका वैज्ञानिकाने ‘महामारी पसरवणार्या विषाणूला कसे बनवायचे ?’, याची माहिती मागितली. तेव्हा त्याने वैज्ञानिकाला ८ सहस्र शब्दांचे सविस्तर निर्देश दिले.
७. एआय आस्थापने दावा करतात की, त्या सतत सुरक्षा कवच सशक्त करत आहेत, पण तज्ञ त्यांना ‘अक्षम कुंपण’ मानतात, जे ‘जेल-ब्रेकिंग’ने सहजपणे भेदले जाऊ शकते. (ही अशी पद्धत आहे, ज्यातून कोणत्याही एआय मॉडलला स्वत:च्या प्रश्नातून गोंधळात टाकले जाते आणि त्याच्याकडून मानवाला धोकादायक असलेली माहिती काढून घेतली जाऊ शकते.)
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड
Attack On Ship : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय व्यापारी नौकेवर आक्रमण : ११ पैकी १ कर्मचारी बेपत्ता