राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चपलेच्या धुळीच्या बरोबरीचेही नसल्याचे केले होते विधान

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) / भाग्यनगर (तेलंगाणा) – लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याच्या प्रकरणी तेलंगाणा पोलिसांनी दूरदर्शनचे पत्रकार अशोक श्रीवास्तव यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी तेलंगाणा पोलिसांनी गाझियाबाद येथे श्रीवास्तव यांच्या घरी जाऊन त्यांना नोटीस बजावली. या वेळी श्रीवास्तव घरी नव्हते.
FIR registered against DD News Anchor Ashok Srivastava in Telangana for criticising Rahul Gandhi during a debate on Swatantryaveer Savarkar.#TelanganaPolice even reached Ghaziabad to serve notice to him.
Is it surprising that such a case has been registered in Telangana, where… pic.twitter.com/Y75U9zzNJi
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 6, 2026
भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यासाठी भाग्यनगरमधील २ पोलीस उपनिरीक्षकांचे पथक गाझियाबादमधील लिंक रोड पोलीस ठाण्याच्या सीमेतील सूर्यनगर भागात पोचले होते.
काय म्हणाले होते अशोक श्रीवास्तव ?
‘डीडी न्यूज’वाहिनीवरील एका चर्चेमध्ये भाजपचे प्रवक्ते तुहिन सिन्हा, राजकीय विश्लेषक सय्यद जावेद आणि इतर पाहुणे यांच्या उपस्थितीत श्रीवास्तव यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा संदर्भ देत श्रीवास्तव म्हणाले होते की, ‘तुम्ही सावरकरांच्या चपलेच्या टोकाच्याही बरोबरीचे नाही. तुम्ही त्यांच्या चपलेच्या धुळीच्या हजारव्या भागाइतकेही नाही. राहुल गांधी हे वीर सावरकरांच्या चपलेच्या तळाला लागलेल्या धुळीच्या कणासारखेही नाहीत.’
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !