
नवी देहली – ग्रीनलँड, दक्षिण कोरिया, स्विडन आणि जपान सारख्या श्रीमंत देशांमध्ये आत्महत्येचे प्रमाण पुष्कळ अधिक आहे. दुसरीकडे पाकिस्तान, सीरिया, लेबनॉन, पॅलेस्टाईन यांसारख्या इस्लामी देशांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अत्यंत अल्प आहे.
Despite severe poverty and widespread conflict, suicide rates reportedly low in some Islamic countries
Because Islam teaches that suicide is forbidden, Muslims follow this principle; whereas, although Hinduism also regards suicide as a sin, some Hindus still commit suicide due… pic.twitter.com/yHegl2VoZp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 4, 2026
१. पॅलेस्टाईनमध्ये आत्महत्येचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. पॅलेस्टाईन गरिबी आणि इस्रायलसमवेतचे युद्ध यांचा फटका सोसत आहे. वर्ष २०२१ मध्ये प्रति एक लाख लोकांत आत्महत्येचा आकडा केवळ ०.७८ टक्के होता.
२. सीरिया गृहयुद्ध आणि सत्तापालट यांसारख्या समस्यांचा सामना करत आहे. येथे आत्महत्येचे प्रमाण प्रति लाख केवळ ०.८९ टक्के इतकाच आहे.
३. लेबनॉनमध्येही गरिबी शिगेला पोचली आहे. हा देशही युद्धात अडकलेला आहे; परंतु लेबनॉनमध्येही आत्महत्येचे प्रमाण प्रति लाखामध्ये ०.९४ टक्के आहे.
४. पाकिस्तानमध्येही पुष्कळ गरिबी आहे, वाढत्या महागाईनंतरही पाकिस्तानमध्ये आत्महत्येचे प्रमाण अत्यंत अल्प आहे.
५. अफगाणिस्तानमध्ये लोक गरिबी आणि कुपोषण यांचा सामना करत आहेत. अफगाणिस्तान दीर्घकाळापासून युद्धात अडकलेला असल्यामुळे तिथे महागाई आणि बेरोजगारी आहे. असे असूनही या देशात आत्महत्येचे प्रमाण अत्यंत अल्प आहे.
इस्लाममध्ये आत्महत्या हराम !
इस्लामी देशांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अल्प असते; कारण इस्लाममध्ये स्वतःची हत्या करणे ‘हराम’ (इस्लामनुसार अयोग्य) मानले जाते. याच कारणामुळे इस्लामी देशांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अल्प आहे. जगातील श्रीमंत आणि विकसित देशांपैकी स्विडन, बेल्जियम आणि ग्रीनलँड सारख्या देशांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. याचे एक कारण तिथे इच्छा मरणाला असलेली कायदेशीर वैधता हे देखील आहे.
भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होतात आत्महत्या !
भारतातील आत्महत्येच्या प्रमाणाच्या संदर्भात ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ने वर्ष २०२३ मधील प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार आत्महत्येचे प्रमाण १२.३ (प्रति १ लाख लोकसंख्येमागे) इतके आहे. वर्ष २०२३ मध्ये भारतात एकूण १ लाख ७१ सहस्र ४१८ लोकांनी आत्महत्या केली. वर्ष २०२२ च्या तुलनेत (१ लाख ७० सहस्र ९२४) यामध्ये अनुमाने ०.२९ टक्के वाढ झाली आहे.
भारतातील आत्महत्येची प्रमुख कारणे
१. कौटुंबिक समस्या : अनुमाने ३३ टक्के प्रकरणांमध्ये हे मुख्य कारण असल्याचे आढळले.
२. आजारपण : १८ टक्क्यांहून अधिक लोक शारीरिक किंवा मानसिक आजारपणामुळे आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलतात.
३. लग्नाशी संबंधित प्रश्न : अनुमाने ५ टक्के प्रकरणे
४. अमली पदार्थांचे सेवन : ६ टक्क्यांहून अधिक प्रकरणे.
५. आर्थिक संकट (कर्ज/गरिबी) : अनुमाने ४ टक्के ते ७ टक्के प्रकरणे.
६. विद्यार्थ्यांमधील आत्महत्येचे प्रमाणही अनुमाने ८ टक्के आहे.
१८ ते ४५ वयोगटांतील तरुण प्रौढ भारताच्या एकूण आत्महत्येमध्ये ६६ टक्के वाटा व्यापतात, जे अत्यंत चिंताजनक आहे.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !