‘अज्ञाता’ने मारल्याचा दावा

नवी देहली – हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सज्जाद अहमद पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळला. या घटनेमुळे पाकिस्तानात सक्रीय असलेल्या आतंकवाद्यांच्या गूढ हत्यांच्या प्रकरणात आणखी एका घटनेची भर पडली आहे. अहमद याच्या मृत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Terror Commander’s Mystery Death Sparks Speculation
A commander of Hizbul Mujahideen has reportedly died under suspicious circumstances in Pakistan.
Former Indian intelligence operative Lucky Bisht has claimed that ISI chief Asim Malik and Pakistan Army chief Asim Munir are… https://t.co/84U9ztFpH3 pic.twitter.com/R6zrmUCCEx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 4, 2026
भारताचे माजी गुप्तहेर लकी बिष्ट यांनी दावा केला आहे की, ‘आयएस्आय (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा) प्रमुख असीम मलिक आणि सैन्यदलप्रमुख असीम मुनीर सध्या अस्वस्थ आहेत. याचे कारण ‘अज्ञात बंदूकधारी’ आहेत. इस्लामाबादमध्ये अशी चर्चा आहे की, या अज्ञात बंदूकधार्याने गेल्या ६ वर्षांपासून पाकिस्तान्यांची झोप उडवली आहे. हा अज्ञात बंदूकधारी कधी ‘जैश’च्या कमांडरला मारतो, तर कधी ‘लष्कर-ए-तोयबा’च्या आतंकवाद्याला ठार मारतो. सज्जाद अहमद याची इस्लामाबादमधील घरातच हत्या करण्यात आली. सज्जाद अहमद हा हिजबुलचा मोठा कमांडर होता. आयएस्आयचे अधिकारी या अज्ञात बंदूकधार्यामुळे इतके हैराण झाले आहेत की, आता ते ‘आतंकवाद्यांच्या अंत्यविधीला जाऊन आम्ही थकलो आहोत’ असे म्हणू लागले आहेत. आयएस्आयची सहस्रो कुलपे आणि सुरक्षाही आतंकवाद्यांना वाचवू शकणार नाही. ज्याने कुणी भारताच्या विरोधात चुकीचा विचार केला आहे, त्यांना मरावेच लागेल.’
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक