‘शिवाजी कोण होता ?’ पुस्तकावर बंदी घालण्याची सोलापूरमध्ये मागणी !

निवेदन देतांना डावीकडून सर्वश्री संदीप ढगे, विनोद रसाळ, महादेव पाटील आणि निवेदन स्वीकारतांना तहसीलदार श्री. दिनेश पारगे

सोलापूर – येथे २९ एप्रिल या दिवशी ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून अवमानकारक मांडणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पुस्तकामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जात असून इतिहासाचे विकृतीकरण होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

समितीने पुस्तकाची विक्री आणि वितरण तातडीने बंद करून बाजार, ग्रंथालये आणि डिजिटल स्वरूपातील सर्व प्रती हटवाव्यात, तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. (अशा मागण्या का कराव्या लागतात ? – संपादक) या वेळी जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने सोलापूरचे तहसीलदार श्री. दिनेश पारगे यांनी निवेदन स्वीकारले.