
काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५, म्हणजेच १ वर्ष १० दिवसांपूर्वी आतंकवाद्यांनी धर्म विचारून हिंदु पर्यटकांवर आक्रमण केले होते. ही घटना भारत कधीही विसरू शकणार नाही. पहलगाम येथे आतंकवाद्यांनी पर्यटकांना सर्वप्रथम त्यांची नावे विचारली. त्यांच्या धर्माविषयी चौकशी केली आणि त्यांना कलमापठण करण्यास सांगितले. जे कलमापठण करू शकले नाहीत, त्यांची हत्या करण्यात आली. अगदी याचसारखी घटना पहलगामपासून २ सहस्र १०० किलोमीटर दूर ठाण्याच्या मीरा रोड परिसरात घडली. जैब जुबेर अन्सारी या धर्मांध मुसलमानाने २ हिंदु सुरक्षारक्षकांना त्यांचा धर्म विचारला आणि कलमापठण करण्यास सांगितले. कलमापठण न करता आल्याने त्याने दोघा हिंदु सुरक्षारक्षकांवर चाकूने आक्रमण केले. नावे विचारून आणि धर्मावरून ओळख पटवून केलेले हे आक्रमण पहलगाममधील घटनेपेक्षाही अधिक धोकादायक आहे; कारण आक्रमण करणारा धर्मांध मुसलमान अशिक्षित नव्हता किंवा तो सीमा ओलांडून भारतात आलेला नव्हता. अमेरिकेत शिक्षण घेतलेला ३१ वर्षीय धर्मांध जुबेर अन्सारी गेल्या २ वर्षांपासून मीरा रोड परिसरात रहात होता. तो शिक्षक असून गणित आणि रसायनशास्त्र हे विषय विद्यार्थ्यांना शिकवत असे. पहलगाम आणि मीरा रोड येथील घटनांमागे जिहादी धर्मांधतेचे विष आहे अन् आक्रमणाचा उद्देश सारखाच आहे, तो म्हणजे ‘काफिरांना म्हणजेच हिंदूंना लक्ष्य करणे’, म्हणूनच मुंबईत जे घडले, तो पहलगाम आक्रमणाचा भाग २ आहे.
विज्ञान आणि गणित यांसारखे विषय अभ्यासणार्यांच्या मनाची जडणघडण करतात, त्यांची विचारसरणी तर्कशुद्ध अन् वैज्ञानिक बनवतात, असे म्हटले जाते. वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले लोक कट्टर बनू शकत नाहीत; कारण त्यांची प्रवृत्ती तार्किक प्रश्न विचारण्याकडे असते, असेही म्हटले जाते. निरक्षर किंवा अशिक्षित मुसलमान जिहादी आतंकवादाच्या आहारी जातात, असेही मानले जात होते. या सर्व मान्यता अलीकडे होत असलेल्या आतंकवादी घटनांमधून चुकीच्या सिद्ध झाल्या आहेत. जिहादी धर्मांध मानसिकता हा यांमागील किडा आहे. ज्या उमर नबी नावाच्या व्यक्तीने १० नोव्हेंबर २०२५ या दिवशी देहलीतील लाल किल्ल्यासमोर आत्मघातकी बाँबस्फोट घडवून आणला होता, तो एक डॉक्टर होता. या बाँबस्फोटाचा कट रचणार्या ४ आरोपींपैकी ३ जण डॉक्टर होते. फरीदाबाद प्रकरणात समोर आलेल्या आतंकवाद्यांमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांचा समावेश होता. वर्ष २०१५ मध्ये पुणे पोलिसांनी ‘अल्-कायदा’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित जुबेर हंगरगेकर याला अटक केली होती, तो एक ‘सॉफ्टवेअर इंजिनीयर’ आहे. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ आस्थापनात धर्मांतराच्या कृत्यांमध्ये सहभागी असलेले सर्व धर्मांध मुसलमान ‘सॉफ्टवेअर इंजिनीयर’ आहेत. ही सूची पुष्कळ मोठी आहे. मीरा रोड परिसरातील जुबेर याच्या घरात ‘इसिस’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित साहित्य सापडले. त्याच्या घराच्या झडतीच्या वेळी त्याच्या दारावर कुराणमधील काही ओळी आढळल्या आणि ‘कुराणच्या काही विशिष्ट ओळी म्हणून आत प्रवेश करा’, असे लिहिलेला कागदही दारावर आढळला. आतापर्यंत धर्मांधतेचे धागेदोरे कुराणशी संबंधितच अधिकतर आढळले आहेत. ‘मनुस्मृती’त अयोग्य काहीही नसतांना ती जाळणारे आजपर्यंत अनेक जिहादी आतंकवादी ज्यातून प्रेरणा घेतात, त्या पुस्तकाविषयी एक शब्दही बोललेले नाहीत, हे लक्षात घ्या.

देशात ठिकठिकाणी धर्मांध लांडगे
जुबेरच्या घरात जी कागदपत्रे सापडली, त्यात गाझा, जिहाद, ‘लोन वुल्फ’ असे शब्द आढळले. ‘लोन वुल्फ’ म्हणजेच ‘एकाकी लांडगा’. अशी व्यक्ती कोणत्याही विशिष्ट आतंकवादी संघटनेची सदस्य नसते, तरीही ती आतंकवादी गटाच्या विचारसरणीने प्रभावित असते आणि ती संघटनेच्या कोणत्याही प्रत्यक्ष साहाय्याविना किंवा पाठिंब्याविना आक्रमणे घडवून आणते. हे जिहादी धर्मांध सर्वांत धोकादायक असतात. ते ‘बाँब कसे बनवायचे ?’, ‘शस्त्रे कशी हाताळायची ?’ हे ऑनलाईन शिकतात. दैनंदिन जीवनात ते अगदी सामान्य वाटतात; मात्र एखाद्या दिवशी अचानकपणे ते हातात चाकू, बंदूक किंवा बाँब घेऊन रस्त्यावर उतरू शकतात आणि निरपराध लोकांची हत्या करू लागतात. धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंच्या सणावारी होणारी छोटी-मोठी आक्रमणे पहाता भारतभरात हे धर्मांध लांडगे एकाकी आणि सामूहिकपणे हिंदूंच्या विरोधात सातत्याने जिहाद करत असल्याचे दिसते. त्याचे ठोस पुरावे समोर असूनही लोकशाहीतील कोणतीही शासकीय यंत्रणा अद्यापपर्यंत याला इस्लामी आतंकवादी अथवा जिहादी धर्मांधता ठरवत नाही. अजूनही अशा अनेक प्रकरणांत ‘कट्टरतावाद’, ‘समाजकंटक’ आदी शब्दांपर्यंतच उल्लेख केला जातो. मीरा रोड परिसरातील घटना जुबेर या एकाकी लांडग्याची आहे. भारतभरात असे किती एकाकी लांडगे निपजलेले असतील, याची कल्पना केल्यास देशाला आणि पर्यायाने हिंदूंना असलेला मोठा धोका लक्षात येऊ शकतो. जिहादी धर्मांधतेचे समूळ उच्चाटन झाले, तर आणि तरच भारतातील हिंदू सुरक्षित राहू शकतील.
हिंदूंसाठी पहिल्या फळीची सुरक्षा
भारतात अल्पसंख्यांकांवर आक्रमणे होतात, हे कथानक चालवून बहुसंख्य हिंदूंवर सातत्याने आक्रमणे झाली आहेत आणि अद्यापही होत आहेत. आक्रमणकर्त्यांमध्ये अल्पसंख्य असलेले धर्मांध मुसलमानच बहुसंख्य आहेत. गावागावांत वाढलेली मुसलमानांची संख्या पहाता भारतात हिंदू बहुसंख्य राहिले आहेत का ? हे येत्या जनगणनेनंतर समोर येईलच; पण तोपर्यंत आहे तितक्या हिंदूंना स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागणार आहे; कारण मीरा रोड परिसरात धर्मांध जुबेरने ज्यांच्यावर आक्रमण केले, ते दोघेही सुरक्षारक्षक होते. सुरक्षारक्षकाला ठाऊक हवे तेवढे प्राथमिक स्वरक्षणाचे ज्ञान किती आत्मसात केले गेले होते ? हेही पहायला हवे. जर सुरक्षारक्षकांना स्वतःची सुरक्षा करता येत नसेल, तर सामान्य हिंदूंच्या जिवाचे रक्षण कोण करणार ? जागोजागी वाढलेल्या जिहादी धर्मांधांची संख्या किती असेल, याची माहिती हिंदूंना अद्याप नाही. त्यामुळेच शेजारी रहाणार्या जिहाद्याने आक्रमण केले, तर किमान भांडी फेकून मारण्याइतकी बुद्धी वेळेवर व्हावी, यासाठी तरी किमान स्वसंरक्षणाचे धडे गिरवणे हिंदूंसाठी अपरिहार्य झाले आहे. दैवकृपेने देशात हिंदुत्वनिष्ठ संघटना जीव तोडून हिंदूंना संघटित करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. साम्यवादी त्यांना गुंड ठरवतात, तर काँग्रेससारखे हिंदुद्वेषी पक्ष आणि संघटना त्यांच्यावर बंदी घालण्याचा आटापिटा करत आहेत. साम्यवादी आणि हिंदुद्वेषी ज्यांना मोठा विरोध करत आहेत, म्हणजे तेच हिंदूंच्या रक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, हे समजून घ्यायला हरकत नाही. अशा हिंदुत्वनिष्ठांच्या पाठीशी उभे राहून संघटित होणे आणि स्वसंरक्षण शिकणे, हीच हिंदूंसाठी पहिल्या फळीची सुरक्षा आहे.
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावलेल्या देवतांच्या टाईल्स पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने काढल्या !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !