
मुंबई – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या वतीने ‘यशवंतराव चव्हाण मुंबई–पुणे द्रुतगती मार्गा’च्या क्षमता वाढीअंतर्गत उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्रदिनानिमित्त १ मे या दिवशी दुपारी १२.३० वाजता पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

या वेळी केंद्रीय आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहातील, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार याही उपस्थित असतील. मिसिंग लिंक जगातील सर्वांत रुंद बोगदा (२३.५ मीटर) आहे. ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये त्याची नोंद झालेली आहे.
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
(म्हणे) ‘पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी आणावी !’
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती