आज १ मे २०२६ या दिवशी श्री कूर्म जयंती आहे. त्या निमित्ताने...
‘आतापर्यंत विविध युगांमध्ये विविध देवतांचे अनेक अवतार झाले आहेत. त्यांनी आसुरी शक्तींचा नाश करून भक्तांचे आणि भूमातेचे नेहमी रक्षणच केले आहे. या सर्व अवतारांमध्ये श्रीविष्णूचे दशावतार सर्वत्र विख्यात आहेत. यांतील दुसरा अवतार, म्हणजे ‘कूर्मावतार’ याविषयी आपल्यापैकी बहुतेकांना अत्यल्प माहिती आहे. आजच्या या लेखातून सूक्ष्म-ज्ञानातून उमजलेले ‘श्री कूर्मावताराविषयीचे गूढ रहस्य आणि विस्तृत ज्ञान’, जाणून घेणार आहोत.

१. श्रीविष्णूचे दशावतार आणि त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

२. कूर्मावताराच्या उत्पत्तीची कथा

जेव्हा देवासुर सागर मंथनासाठी एकत्र आले, तेव्हा मंदार पर्वताला रवीच्या रूपात आणि वासुकीनागाला दोरीच्या रूपात कार्यरत करून समुद्रमंथन आरंभ झाले. समुद्राची खोली आणि त्यात उसळणार्या मोठमोठ्या लाटा यांमुळे मंदार पर्वत स्थिर न रहाता तो समुद्रात बुडू लागला. एवढ्या विशाल मंदार पर्वताला स्थिर करण्यासाठी श्रीमन्नारायणाने विशाल कासवाचा अवतार, म्हणजे ‘कूर्मावतार’ धारण केला. या कूर्मावताराने सागरात जाऊन स्वतःच्या पाठीवर मंदार पर्वत धारण केला. त्यामुळे मंदार पर्वताला स्थैर्य प्राप्त झाले आणि समुद्रमंथनाची प्रक्रिया निर्विघ्नपणे पूर्ण होऊ शकली.
३. कूर्मावताराच्या रूपाची वैशिष्ट्ये
श्रीविष्णूचा ‘कूर्मावतार’ हा त्याचा दुसरा अवतार असून त्याचे प्रागट्य सत्ययुगात झाले. कूर्मावताराच्या चारही हातांमध्ये श्रीविष्णूप्रमाणे शंख, सुदर्शनचक्र, गदा आणि पद्म (कमळ) आहे. त्याचप्रमाणे कूर्मावताराची कांती श्रीविष्णूच्या कांतीप्रमाणे तेजस्वी निळसर रंगाची असून त्याच्या भोवती सोनेरी रंगाची किनार आहे.

४. श्री कूर्मावताराचा परिवार
४ अ. श्री कूर्मावताराशी संबंधित दोन शक्ती : भूदेवीच्या कृपेमुळे कूर्मावताराची पाठ कठोर आणि बळकट बनली. त्यामुळे कूर्मावतारामध्ये प्रचंड सहनशक्ती होती आणि त्याला विशाल मंदार पर्वताचा भार स्वतःच्या पाठीवर धारण करणे शक्य झाले. तसेच त्याच्या नखांमध्ये श्री महालक्ष्मीच्या मारक शक्तीचा वास आहे. त्यामुळे कूर्मावताराच्या नखांतून मारक शक्ती प्रगट होत असते.
४ आ. श्री कूर्मावताराच्या २ शक्ती किंवा पत्नी : कूर्मगंधा आणि कूर्ममालिनी या श्री कूर्मावताराच्या २ पत्नी आहेत. कूर्मगंधामुळे समुद्रातील विषारी वनस्पतींचा नाश होतो. तसेच कूर्ममालिनीमुळे समुद्रातील जलाची शुद्धी होऊन जलाची सात्त्विकता आणि पावित्र्य वाढते.
४ इ. श्री कूर्मावताराची कन्या आणि पुत्र : ‘कूर्मजा’ ही कूर्मावताराची कन्या असून ‘कूर्मध्वज’ आणि ‘कूर्मकेतु’ हे त्याचे पुत्र आहेत. कूर्मजापासून नदी आणि समुद्र येथे रहाणार्या कासवांची निर्मिती झाली. ‘कूर्मध्वज’ आणि ‘कूर्मकेतु’ या कूर्मपुत्रांमुळे भारताच्या सामुद्रीसीमा सुरक्षित आहेत.
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.४.२०२६) (क्रमशः)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1035845.html
‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
खासगी संस्थांची नोंदणी अनिवार्य नाही !
स्त्रियांचे मानसिक आरोग्य आणि ‘हार्मोन्स’ (संप्रेरक) : आयुर्वेदाचा समतोलाचा मार्ग
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)