‘१.५.२०२६ या दिवशी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या संरचनेची सेवा करणार्या चि.सौ.कां. भाग्यश्री धांडे यांचा शुभविवाह जळगाव येथील चि. आदित्य अटाळे यांच्याशी होत आहे. त्यानिमित्त साधकांच्या लक्षात आलेली चि.सौ.कां. भाग्यश्री धांडे यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. आदित्य अटाळे आणि चि.सौ.कां. भाग्यश्री धांडे यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. स्वयंशिस्त
‘भाग्यश्री आश्रमात वास्तव्यास असतांना ती ठरलेल्या वेळेत वैयक्तिक कामे आणि सेवा करत असे.
२. प्रगल्भता
तिचे विचार प्रगल्भ आहेत. समोरच्या व्यक्तीला ‘काय हवे आहे ?’, हे ओळखून ती त्या व्यक्तीला सहजतेने साहाय्य करते.
३. सात्त्विक रहाणीमान
भाग्यश्रीची वेशभूषा सात्त्विक असते. तिला मायेतील गोष्टींचे आकर्षण फारसे नाही.
४. शांत आणि समंजस
ती वयस्कर साधकांना संयमाने आणि शांतपणे सेवा समजावून सांगते.
५. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

भाग्यश्रीला व्यष्टी साधनेच्या आढाव्यात जे प्रयत्न सुचवले जातात, ते ती मनापासून स्वीकारते आणि नंतरच्या आठवड्यात ती त्याचा व्यवस्थित आढावा देते. एखाद्या आठवड्यात तिचे प्रयत्न न्यून झाल्यास तसे ती प्रामाणिकपणे सांगते. तिला कुणीही चूक सांगितल्यास ती सहजतेने चूक स्वीकारते.
६. समन्वय कौशल्य
भाग्यश्री ‘ऑनलाईन’ सनातन प्रभात’शी संबंधित सेवांचा समन्वय अत्यंत कुशलतेने करत असे. तिने केलेल्या सेवेत उत्तरदायी साधकांना अधिक लक्ष देण्याची आवश्यकता भासत नव्हती.
७. सेवाभाव
७ अ. भाग्यश्री आश्रमात असतांना संतसेवा भावपूर्ण करत होती.
७ आ. अधिकाधिक सेवा करण्याचा प्रयत्न करणे : ती महाप्रसाद ग्रहण करतांनाही अनावश्यक बोलत नाही. ‘तिला मुळातच सात्त्विक गोष्टींची आवड असून ती सतत ‘सत्’मध्ये रहाण्याचा प्रयत्न करते’, असे जाणवते.
७ इ. घरकाम आणि सेवा यांची योग्य सांगड घालणे : भाग्यश्रीला काही कारणानिमित्त पुणे येथे घरी जावे लागले. ती घरी राहून सेवा करत होती. तिचे आई-वडील (सौ. राजश्री धांडे आणि श्री. रवींद्र धांडे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६२ वर्षे) प्रसार सेवेसाठी बाहेर असतांना ती घरकाम आणि सेवा यांची योग्य सांगड घालते.
७ ई. एकाग्रतेने सेवा करणे : भाग्यश्री संरचना (Formatting/Design) संदर्भातील सेवा अतिशय अचूक आणि सतर्क राहून करते. ती वैयक्तिक कामांत कितीही व्यस्त असली, तरीही सेवेच्या बाबतीत ‘उरकायचे’ असे म्हणून सेवा न करता ती पूर्ण एकाग्रतेने सेवा करते.
७ उ. सेवा करण्याचा ध्यास : तिच्या विवाहाला केवळ एक मास शेष असतांनाही तिने सेवा अधिकाधिक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तिची विवाहानंतरही सेवा करण्याची तीव्र इच्छा असून लवकरच ती सेवा पुन्हा चालू करणार असल्याविषयी तिने सांगितले.’
– पाक्षिक ‘सनातन प्रभात’ सेवेशी संबंधित साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.४.२०२६)

मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
धर्मशास्त्र काय सांगते ?
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान