संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ‘एस्.सी.ओ.’च्या बैठकीसाठी किर्गिस्तानच्या दौर्यावर !
(एस्.सी.ओ. – शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन)

नवी देहली – भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे आयोजित ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या (एस्.सी.ओ.) बैठकीसाठी किर्गिस्तानच्या दौर्यावर आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी चीन, रशिया आणि बेलारूस या देशांच्या संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली.
चीनचे संरक्षण मंत्री ॲड्मिरल डोंग जून यांच्याशी झालेल्या भेटीच्या वेळी ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर’ शांतता आणि स्थिरता राखणे, तसेच व्यापक प्रादेशिक सुरक्षा या विषयांवर चर्चा केली. राजनाथ सिंह यांनी रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलौसोव्ह यांचीही भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी विविध संरक्षण खरेदी प्रकल्पांवर, विशेषतः भारताला ‘एस्-४००’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीचा पुरवठा करण्याच्या सूत्रावर चर्चा केल्याचे समजते. राजनाथ सिंह यांनी बेलारूसचे संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल व्हिक्टर यांचीही भेट घेतली. त्यांच्या चर्चेचा मुख्य भर दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक बळकट करण्यावर होता.
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी