
मुंबई – आतंकवादी दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्बाल मिर्ची याच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) कार्यवाही केली होती. मुंबईतील विशेष (पी.एम्.एल्.ए.) न्यायालयाने २९ एप्रिल या दिवशी इक्बाल मिर्ची आणि त्याचे कुटुंबीय यांच्या मालकीच्या मुंबई अन् दुबई येथे असलेल्या अतिरिक्त मालमत्ता जप्त करण्यास ईडीला अनुमती दिली आहे. ही कारवाई ‘पसार आर्थिक गुन्हेगार कायदा (एफ्.इ.ओ.ए.) २०१८’ या अंतर्गत केली जाणार आहे. गुन्हेगारी जगतातील काळा पैसा पांढरा करणार्या जाळ्यावर ईडीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. गुन्हेगारी कृत्यांतून मिळालेल्या पैशांतून या मालमत्तांची खरेदी करण्यात आली होती.
वरळी परिसरातील ‘राबिया मॅन्शन’, ‘मरियम लॉज’ आणि ‘सी व्ह्यू’ ३ अत्यंत महागड्या मालमत्तांचा या जप्तीत समावेश आहे. त्यांचे एकूण क्षेत्रफळ ४ सहस्र ९७०.४१ चौरस मीटर इतके आहे. मिर्चीने वर्ष १९८६ मध्ये या मालमत्ता केवळ ६.५ लाख रुपयांत खरेदी केल्या होत्या, ज्यांची आजची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. या मालमत्तांच्या बाहेर सरकारी जप्तीचे फलक लावले जातील. यानंतर त्यांचा लिलाव करून जप्तीप्रक्रिया होईल. दुबईतील ‘हॉटेल मिडवेस्ट अपार्टमेंट्स’, ‘कॉर्पोरेट बे’ आणि ‘डीईसी टॉवर्स’मधील १४ ‘रिअल इस्टेट युनिट्स’ ईडीकडून जप्त करण्यात येणार आहेत.
या मालमत्ता जप्त होऊ नये; म्हणून मिर्चीने विविध न्यास आणि बनावट भाडेकरू यांच्या माध्यमातून कागदपत्रांमध्ये फेरफार केले होते. मालमत्ता मिळवण्यासाठी १५४ कोटी रुपये परदेशात वळवण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचे धागेदोरे डी.एच्.एफ्.एल्.च्या वधावन बंधूंशीही जोडले गेले आहेत.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
कोलकात्याच्या सुरेंद्रनाथ महाविद्यालयामधील तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात सापडली मोठी रक्कम
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त