आज ३० एप्रिल २०२६ या दिवशी श्री नृसिंह जयंती आहे. त्या निमित्ताने...

१. सत्ययुगात भक्त प्रल्हादाच्या भक्तीमुळे श्रीविष्णूचा चौथा अवतार ‘श्री नृसिंह अवतार’ प्रगट होणे
‘सत्ययुगात परम विष्णुभक्त प्रल्हाद याचा त्याचे वडील हिरण्यकश्यपू अतोनात छळ करत होते. तेव्हा हिरण्यकश्यपूच्या विष्णुद्वेषाने सार्या सीमा ओलांडल्या. हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादावर गदा उगारून त्याला ठार करण्याचा प्रयत्न करू लागला आणि प्रल्हादाला म्हणाला, ‘‘महालातील खांबातून तुझ्या देवाला प्रगट होण्यास सांग.’’ तेव्हा भक्त प्रल्हादाने श्रीविष्णूचे संपूर्ण शरणागतीने स्मरण करून त्यास महालातील खांबातून प्रगट होण्याची आर्त प्रार्थना केली. भक्त प्रल्हादाची प्रार्थना ऐकून भगवान नृसिंह खांबातून प्रगट झाला आणि त्याने हिरण्यकश्यपूचा वध केला. अशा प्रकारे भगवान श्रीविष्णूचा चौथा अवतार ‘श्री नृसिंह अवतार’ भूतलावर प्रगट झाला. या अवताराची मारक शक्ती इतकी भीषण होती की, तिने नऊ प्रकारच्या नरसिंहांचे रूप धारण केले होते. त्यामुळे नवनरसिंहातून प्रक्षेपित होणार्या आगीच्या लोटांमुळे सृष्टीची हानी होऊ लागली; परंतु नृसिंह अवताराला शांत करण्याचे धैर्य आणि सामर्थ्य कोणामध्येही नव्हते. तेव्हा भक्त प्रल्हाद पुढे आला आणि त्याने सुंदर फुलांची माळ नृसिंहाच्या गळ्यात घातली. भक्त प्रल्हादाला पाहून नृसिंहाचा वात्सल्यभाव प्रगट झाला आणि त्याचा क्रोध शांत झाला. त्याचे भक्तवत्सल अन् प्रीतीमय शांत रूप प्रगट झाले. श्री नृसिंहाने भक्त प्रल्हादाला त्याच्या मांडीवर बसवून त्याचे लाड केले. आजच्या या लेखात आपण श्री नृसिंह अवतारासह त्याच्या दहा रूपांची विविध गुणवैशिष्ट्ये पहाणार आहोत.
२. श्री नृसिंह अवतारांची विविध आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

२ अ. तेजतत्त्व प्रधान : श्रीविष्णूच्या सर्व अवतारांमध्ये श्री नृसिंह अवतार हा तेजतत्त्वप्रधान अवतार आहे. त्यामुळे त्याचे कार्य पूर्णपणे तेजतत्त्वाच्या स्तरावर झाले.
२ आ. पुष्कळ प्रगट शक्ती असणे : श्रीविष्णूच्या ‘मत्स्य, कूर्म, वराह आणि वामन’ या चार अवतारांच्या तुलनेत श्री नृसिंह अवताराची शक्ती पुष्कळ प्रमाणात प्रगट स्वरूपाची आहे.
२ इ. प्रचंड मारक शक्ती : श्रीविष्णूच्या नृसिंह अवताराची मारक शक्तीही प्रचंड आहे. त्यामुळे त्याच्या या मारक शक्तीशी लढतांना दैत्यराज हिरण्यकश्यपूचा पराभव झाला.
२ ई. उग्रतम स्वरूप : श्रीविष्णूच्या नृसिंह अवताराचे स्वरूप अत्यंत उग्रतम आहे. त्याचे हे तेज आपल्याला सहन होत नाही. त्यामुळे आपण त्याचे चित्र किंवा मूर्ती हिच्याकडे फार वेळ सलग पाहू शकत नाही.
२ उ. देहरूपी शस्त्र आणि अग्नीरूपी अस्त्र : श्रीविष्णूच्या नृसिंह अवताराची नखे हेच त्याचे शस्त्र होते आणि त्याच्या देहातून बाहेर पडणार्या अग्नीज्वाला त्याचे अस्त्र होते.’
(क्रमशः)
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : १६.४.२०२६)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1035530.html
गुरूंचे माहात्म्य अन् शिष्याची गुरुभक्ती
शिष्याला ईश्वरप्राप्तीकडे गतीमान करणारी गुरुकृपा !
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !
कल्पनेद्वारे नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये पालटणे !
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?