श्री नृसिंह अवताराची विविध रूपे, त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या उपासनेमुळे होणारे विविध प्रकारचे लाभ !

वैशाख शुक्ल चतुर्दशी (३०.४.२०२६) या दिवशी श्री नृसिंह जयंती झाली. त्यानिमित्त ‘श्री नृसिंह अवताराची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये’ यातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1035277.html

श्री नृसिंह

३. श्री दशनृसिंहांची विविध आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये

श्री नृसिंहाच्या नऊ अवतारांची नऊ मंदिरे आंध्रप्रदेश राज्यातील कर्नुल जिल्ह्यातील ‘अहोबिलम्’ या तीर्थक्षेत्री आहेत. श्री नृसिंह अवताराचे दहावे रूप हे निर्गुण स्वरूप असल्यामुळे त्याचे मंदिर नाही. आजही अनेक भक्त त्यांच्या दर्शनाला जातात आणि नवनृसिंह त्यांना पावतात. अशा या नवनृसिंहांची विविध आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

३ अ. दशनृसिंहाची रूपे, त्यांच्याशी संबंधित पंचतत्त्वांपैकी प्रमुख तत्त्व आणि त्यांच्या उपासकांना येणारी अनुभूती

३ आ. दशनृसिंहाच्या विविध रूपांशी संबंधित दशदिशा आणि नृसिंहाच्या उपासनेने त्रास न्यून होण्याचा स्तर

३ इ. दशनृसिंहाशी संबंधित नवग्रह आणि त्याच्यामुळे साधकाला होणारे विविध लाभ !

टीप – ‘श्री महानृसिंह’ हे भगवान नृसिंहाचे दहावे रूप निर्गुण स्वरूप असल्यामुळे ते कोणत्याही ग्रहाशी संबंधित नसून काळाशी संबंधित आहे.

४. दशनृसिंहाच्या विविध रूपांची उपासना केल्यामुळे व्यष्टी स्तरावर, म्हणजे व्यक्तीला होणारे विविध प्रकारचे लाभ !

सुश्री मधुरा भोसले

४ अ. श्री ज्वाला नृसिंह : चांगले आरोग्य आणि यश प्राप्त होणे

४ आ. श्री उग्र नृसिंह : ध्येयनिश्चिती होऊन ध्येयप्राप्तीतील सर्व प्रकारचे अडथळे दूर होऊन धैर्य वाढणे आणि भयावर मात करता येणे

४ इ. श्री मालोल नृसिंह : धनदौलत आणि भरभराट होऊन उत्कर्ष होणे अन् कर्ज फेडले जाणे

४ ई. श्री क्रोड नृसिंह : भूमीशी संबंधित असणार्‍या व्यवहारात येणारे अडथळे दूर होऊन सर्व व्यवहार पूर्ण होणे

४ उ. श्री कारंज नृसिंह : इच्छापूर्ती होऊन शत्रूंपासून रक्षण होणे

४ ऊ. श्री भार्गव नृसिंह : नेतृत्वगुण वाढून व्यवस्थापन सांभाळता येणे

४ ए. श्री योगानंद नृसिंह : जीवनातील अडचणी आणि दुःख यांचे निवारण होऊन सुख, शांती अन् समाधान लाभणे

४ ऐ. श्री छत्रवट नृसिंह : विविध कलागुणांमध्ये प्राविण्य मिळणे आणि शेतीच्या कार्यात लाभ होणे

४ ओ. श्री पावन नृसिंह : विविध प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळून हृदयात प्रेम आणि करुणा जागृत होणे

४ औ. श्री महानृसिंह : साधकाची वाटचाल सगुणाकडून निर्गुणाकडे होणे

५. दशनृसिंहाच्या उपासनेमुळे होणारे समष्टी स्तरावरील, म्हणजे संपूर्ण समूहाला किंवा सामाईक स्वरूपातील होणारे विविध प्रकारचे लाभ

अ. अपघात न होणे आणि आजार अन् दुःखे दूर होणे

आ. यश, कीर्ती आणि संपन्नता प्राप्त होणे

इ. ईर्ष्या, हेवा, मत्सर, शत्रुत्व आणि अहंकार यांवर मात करता येणे

ई. जीवनातील शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक अडथळे दूर होणे

उ. व्यक्ती ऋणातून (कर्जातून) मुक्त होणे

ऊ. वाईट कर्मांची फळे आणि पापे नष्ट होणे

ए. मनःशांती लाभून संघभाव वाढणे

ऐ. जीवन तणावमुक्त आणि आनंदी होणे

ओ. आध्यात्मिक उन्नती हाेऊन मुक्ती मिळणे

‘हे गुरुदेवा, तुमच्या कृपेमुळे दशनृसिंहाच्या महतीचे अनमोल ज्ञान मिळाले. त्याबद्दल तुमच्या चरणी शतशः नमन. आम्हा साधकांना आपत्काळात तारून नेण्यासाठी आमच्यामध्ये भक्त प्रल्हादाप्रमाणे असीम भक्ती निर्माण होऊन आमच्यावर श्री नृसिंहाच्या दहा रूपांची अगाध कृपा राहू दे’, ही श्री नृसिंह अवताराच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.’

(समाप्त)

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.४.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक