केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

सातारा, २८ एप्रिल (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गौतम आणि माधव खट्टर यांच्या अटकेच्या विरोधात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नावे जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये खट्टर बंधूंना तात्काळ मुक्त करण्यात यावे, ही मुख्य मागणी करण्यात आली.
या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सातारा तालुक्याचे प्रमुख संभाजी कदम, शिवराज तलवार, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे, ठाकरे गटाचे शहर प्रमुख गणेश अहिवळे, ‘धर्मसेतू सेवा संस्थान’चे संकेत शिंदे, वळसे येथील हिंदु राष्ट्र गोशाळेचे गोरक्षक आणि सातारा तालुक्यातील धारकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, जुने गोवे येथे फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपावरून गौतम खट्टर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करतांना त्यांच्या भावाला अटक केली आहे. गोव्यातील ‘हात कातरो’ खांबाशी संबंधित घटना, तसेच सारस्वत ब्राह्मणांवरील अत्याचार यांसारखे हिंदूंवरील ऐतिहासिक अत्याचार दडपण्यासाठीच खट्टर बंधूंवर कारवाई करण्यात आली आहे. फ्रान्सिस झेवियर याचा खरा इतिहास लोकांसमोर येऊ नये, यासाठी दबावतंत्र उपयोगात आणले जात आहे. या विषयीची काही ऐतिहासिक कागदपत्रे भारत आणि पोर्तुगाल सरकारकडे उपलब्ध आहेत. खट्टर बंधूंवर कारवाई करतांना आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पाळण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून खट्टर बांधूंवरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !