भारतीय शास्त्रीय नृत्याच्या संदर्भातील चलत्‌चित्र पाहिल्यावर त्याच्या संदर्भात साधिकेला जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

२९ एप्रिल २०२६ या दिवशी आंतरराष्ट्रीय नृत्यदिन आहे. त्यानिमित्त...

साभार – संकेतस्थळ

१. केवळ एखाद्या वाद्यावर वाजवलेले संगीत ऐकणे आणि नृत्याचे पार्श्वसंगीत म्हणून एखाद्या वाद्यावर वाजवलेले संगीत ऐकणे यांतील भेद

सुश्री (कु.) मधुरा भोसले

‘मी मायाजालवर (इंटरनेटवर) एका नर्तकीचे सात्त्विक कथ्थक नृत्य पहात होते. नर्तकी नृत्य करत असतांना पार्श्वसंगीताच्या स्वरूपात सतारीवर ‘पंचम सवारी’ हा अनवट राग वाजवला जात होता. माझे लक्ष पार्श्वसंगीतावर एकाग्र झाल्यावर मला ‘नाद’, म्हणजेच ‘आकाशतत्त्व’ असे जाणवले. या सात्त्विक नर्तकीने केलेल्या नृत्यातून मात्र वायूतत्त्व प्रक्षेपित होत होते. तो ताल ऐकत असतांना वायूतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत झाल्यामुळे मला आनंदाची अनुभूती आली. यातून ‘एखादा नाद ‘पार्श्वसंगीत’ म्हणून लावल्यावर त्या नादाची स्पंदने नृत्याच्या स्पंदनांशी एकरूप झाल्यामुळे त्या संगीतातून काही वेळा आकाशातत्त्वापेक्षा वायूतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत होते. त्यामुळे केवळ एखाद्या वाद्याचे संगीत ऐकत असतांना शांतीची आणि नृत्यासह एखाद्या वाद्याचे संगीत ऐकत असतांना आनंदाची अनुभूती अधिक प्रमाणात येते. नृत्याला अनुरूप असणारे पार्श्वसंगीत लावणे किती महत्त्वाचे असते’, ही सूत्रे लक्षात आली. याचे उदाहरण म्हणजे शास्त्रीय नृत्य करत असतांना उपशास्त्रीय संगीतातील एखादी बंदीश किंवा चीज लावणे, शास्त्रीय गायन करणे किंवा एखाद्या भारतीय वाद्यावर नृत्याला अनुरूप असणारा राग वाजवणे.

२. काही सात्त्विक नर्तकांचे नृत्य पाहिल्यावर सात्त्विक रसिकांचा भाव जागृत होण्यामागील विविध घटकांचे योगदान

टीप – वरील सारणीवरून ‘नर्तकाने भावपूर्ण नृत्य केल्यामुळे नर्तक आणि रसिक यांचा भाव जागृत होतो’, हे सूत्र शिकायला मिळाले. तसेच नृत्यामुळे कलाकार आणि रसिक यांची भावजागृती होण्यासाठी नृत्याचे पार्श्वसंगीत नृत्याशी अनुरूप असेल, तर नर्तक आणि रसिक यांच्यावर संगीतातून आकाशतत्त्व अन् नृत्यातून वायूतत्त्व यांच्या स्तरांवर आध्यात्मिक लाभ होऊन त्यांना नृत्य आणि संगीत यांच्या लहरींशी लवकर एकरूप होता येते. त्यामुळे नर्तक आणि रसिक यांच्या मनात नृत्य अन् संगीत यांच्या आशयानुसार मनामध्ये विविध प्रकारचे भाव उमटून ते अनुभवताही येतात.

३. शिकायला मिळालेले सूत्र

भारतीय शास्त्रीय नृत्याचे चलत्‌चित्र पहाण्याआधी मला पुष्कळ थकवा जाणवत होता. मी भारतीय नृत्य पाहिल्यानंतर माझा थकवा दूर झाला आणि मला आनंद जाणवू लागला. त्यामुळे ‘भारतीय शास्त्रीय नृत्यामध्ये आध्यात्मिक स्तरावर लाभ मिळण्याचे पुष्कळ सामर्थ्य आहे’, हे सूत्र मला शिकायला मिळाले.

४. कृतज्ञता

‘हे भगवंता, तुझ्या कृपेमुळे भारतीय शास्त्रीय नृत्याच्या संदर्भात मला शिकायला मिळून मला आध्यात्मिक लाभ झाला’, त्याबद्दल मी तुझ्या चरणी लक्ष लक्ष वेळा कृतज्ञता व्यक्त करते.’

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ती साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : २५.११.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक