पाकिस्तानचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांची स्वीकृती
पाकिस्तानात पेट्रोलचा साठा संपला !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानकडे सध्या कच्च्या तेलाचा केवळ ५ ते ७ दिवसांचा साठा उपलब्ध आहे. तसेच एका दिवसाचाही पेट्रोलचा साठा त्याच्याकडे शेष नाही. पाकिस्तानची ऊर्जा व्यवस्था अत्यंत संवेदनशील बनली आहे. ही परिस्थिती साठवणूक क्षमता वाढवण्याची आणि दीर्घकालीन ऊर्जा सज्जतेमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता अधोरेखित करते. भारताला ज्याप्रकारे एका स्वाक्षरीने ६० ते ७० दिवस पुरेल, इतका तेलसाठा मिळतो, तशी पाकिस्तानची परिस्थिती नाही, अशी स्वीकृती पाकिस्तानचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी ‘समा टीव्ही’ने घेतलेल्या मुलाखतीत दिली.
Pakistan’s Petroleum Minister Ali Pervaiz Malik admits: India secures oil with a single signature, while Pakistan struggles for supplies.
Petrol stocks are depleting there.
And this same bankrupt nation dreams of mediating wars between major powers. What could be more… pic.twitter.com/9NVAphytgO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 28, 2026
मलिक पुढे म्हणाले,
‘‘अमेरिका-इराण युद्ध लवकर संपत नसल्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाली आहे. पाकिस्तानने तातडीने ‘ऊर्जा सुरक्षा नियोजन’ करण्याची आवश्यकता आहे. इतिहासात दुबईत कच्च्या तेलाच्या किमती कधीही १७० डॉलर्सपर्यंत पोचल्या नव्हत्या. ही परिस्थिती जागतिक बाजारपेठेतील तीव्र अस्थिरतेचे लक्षण आहे. सरकार जनतेचे हाल न्यून करण्याचा प्रयत्न करत आहे आणि शक्य तेथे अनुदान देण्याचा प्रयत्न करत आहे. पाकची ऊर्जा सुरक्षा सुधारण्यासाठी ३० दिवसांचा ‘क्रूड ऑईल प्रोग्राम’ (कच्च्या तेलाचा कार्यक्रम) सिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’’
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत