जम्मू-काश्मीर पोलिसांनी चोरीला गेलेली गाय ६ दिवसांत शोधून काढली : ३ आरोपींना अटक

(प्रतिकात्मक चित्र)

श्रीनगर – जम्मू-काश्मीर पोलिसांनी चोरीला गेलेली गाय ६ दिवसांत शोधून काढून ती चोरणार्‍या ३ आरोपींना अटक केली आहे, तर एकाला कह्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २१ एप्रिलच्या रात्री आरोपींनी अंधाराचा अपलाभ उठवत एका गोठ्यातून एक गाय चोरून पळ काढला. सकाळी या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली. चोरांना पकडण्यासाठी कटरा-रियासी पोलिसांनी तात्काळ एका विशेष पथकाची स्थापना केली. पोलिसांनी तांत्रिक पाळत (सर्वेक्षण) आणि स्वतःची गुप्तचर यंत्रणा यांचे साहाय्य घेत कुलगाममधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या वेळी पालिसांनी चोरीला गेलेल्या गायीची सुटका केली. यासह गुन्ह्यात वापरलेली एक अल्टो ही चारचाकी गाडीही पोलिसांनी जप्त केली.