दुकान उशिरापर्यंत चालू ठेवल्याने मारहाण केल्याचा दावा
प्रसिद्ध उद्योगपती मोहनदास पै यांनी दर्शवला तीव्र विरोध

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ कन्नमंगला भागात असलेले चहाचे दुकान रात्री उशिरापर्यंत चालू होते. याचे कारण देत स्थानिक देवनहळ्ळी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राकेश यांनी त्या हिंदु असलेल्या दुकानदाराला अमानुष मारहाण केली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यावर लोक मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत. या घटनेवर प्रसिद्ध उद्योगपती टी.व्ही. मोहनदास पै यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे.
A Hindu tea vendor in Bengaluru, severely assaulted by Karnataka Police !
The assault is claimed to have occurred for keeping the shop open beyond permitted hours@TVMohandasPai too condemned the incident
In the Muslim-majority Shivajinagar area of Bengaluru, many Muslim… pic.twitter.com/yrEqJof73c
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 28, 2026
पोलीस निरीक्षक राकेश यांनी केलेल्या मारहाणीचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेर्यात चित्रीत झाले आहे. व्हिडिओमध्ये राकेश अत्यंत उद्दामपणे वागतांना स्पष्ट दिसत आहेत. ते दुकानदाराशी बोलण्याऐवजी थेट लाठी उगारतांना आणि अमानुषपणे मारतांना दिसत आहेत.
आपण गुलाम नाही, स्वतंत्र आहोत ! – मोहनदास पै
पै यांनी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांना थेट आव्हान दिले आहे. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, पोलिसांच्या अमानुष वृत्तीवर लगाम घातला गेला पाहिजे. ते अशा प्रकारे लोकांना कसे काय मारू शकतात ? आपण कुणाच्याही अधीन असलेले गुलाम नाही, तर स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत, अशा शब्दांत त्यांनी या घटनेविषयी संताप व्यक्त केला. या पोस्टमध्ये पै यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तसेच पोलीस महासंचालक यांचाही उल्लेख (मेन्शन) केले आहे.
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !