‘८.२.२०२६ या दिवशी राजगुरुनगर (पुणे) येथील ‘सनातन प्रभात’ चे वाचक देवद (पनवेल) येथील सनातनचा आश्रम पहाण्यास गेले होते. आश्रमात गेल्यावर त्यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. श्री. सोमनाथ नथुराम मुळुक, राजगुरुनगर, पुणे.
१ अ. जाणवलेली सूत्रे
१. ‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील वातावरण आध्यात्मिक असून तिथे सकारात्मक स्पंदने जाणवतात.
२. आश्रमातील सर्व साधक नम्रतेने आणि प्रेमाने आमची विचारपूस करत होते.
३. तेथील भोजनकक्ष स्वच्छ अन् टापटीप आहे.
४. ‘आश्रमात आम्हाला सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधनेचे प्रयत्न करून ‘संतपद’ कसे प्राप्त केले ?’, याची एक ध्वनीचित्रफीत दाखवली.
५. दुसर्या एका ध्वनीचित्रफितीतून ‘साधना करत असतांना येणार्या अडथळ्यांवर मात कशी करायची ?’, यासंदर्भातील मार्गदर्शन मिळाले. या दोन्ही ध्वनीचित्रफितींमधून ‘ईश्वरप्राप्तीसाठी झोकून देऊन साधना करणे महत्त्वाचे आहे, तसेच ‘देव माझ्याकडे सूक्ष्मातून पहात आहे’, याची मला जाणीव झाली.
६. ‘आपल्या जीवनात भौतिक साधनांपेक्षा साधनेला महत्त्व आहे’, हे आम्हाला आश्रमात अनुभवता आले.
१ आ. अनुभूती
१. आश्रमातील लादीवर ‘ॐ’ उमटलेले पाहून माझ्या शरिरावर रोमांच आले.
२. मी ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना माझे मन सकारात्मक झाले.
३. आश्रमातील वातावरणात मला पुष्कळ चैतन्य आणि आनंद जाणवला.
आश्रमातील वातावरणात आमचा संपूर्ण दिवस चांगला गेला. येथे राहून मी प्रतिदिन संध्याकाळी १० मिनिटे नामजप करण्याचा आणि साधकांच्या समवेत राहून साधना करण्याचा निश्चय केला. देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला पुन्हा भेट देण्याचा योग आला, तर मी निश्चितच माझे भाग्य समजेन.’
२. श्रीमती सविता घुमटकर (वय ६५ वर्षे), राजगुरुनगर, पुणे.
२ अ. जाणवलेली सूत्रे
१. ‘आश्रमातील वातावरण शिस्तबद्ध आणि शांत आहे.
२. आश्रमातील साधकांच्या चेहर्यावर मला आनंद जाणवत होता.
३. सद्गुरु स्वाती खाडये यांची ध्वनीचित्रफीत पाहिल्यावर ‘मी साधनेचे प्रयत्न करण्यात पुष्कळ न्यून पडते’, याची मला जाणीव झाली.
४. ‘सात्त्विक उत्पादनांच्या संबंधित सेवा करणारे साधक शांतपणे सेवा करत होते. ते सर्व पाहून मलाही ‘काही दिवस आश्रमात जाऊन सेवा करावी’, असे वाटले.
२ आ. अनुभूती
१. परात्पर गुरु पांडेमहाराज हे पूर्वी वास्तव्य करत असलेल्या खोलीत बसून नामजप करत असतांना आरंभी माझ्या शरिराला मुंग्या आल्यासारखे जाणवले.
२. काही वेळाने मला खोलीतील चैतन्य आणि शांतता अनुभवता आली.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २९.३.२०२६)
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
साधनेतील ‘स्वीकारणे’ या गुणाचे अनन्यसाधारण महत्त्व !