क्रिकेट स्पर्धेत सट्टा लावल्याचा आरोप

बेंगळुरू (कर्नाटक) – क्रिकेट स्पर्धेत सट्टा लावल्याच्या आरोपाच्या प्रकरणी कर्नाटकाचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून चौकशी करण्याचा आदेश लोकप्रतिनिधींच्या विशेष दंडाधिकारी न्यायालयाने दिला होता. या आदेशाला कर्नाटक उच्च न्यायालयाने आता स्थगिती दिली आहे. गृहमंत्री, तसेच तुमकूरुच्या जिल्हाधिकारी शुभा कल्याण यांचाही यात समावेश होता. न्यायमूर्ती एस्. सुनील दत्त यादव यांच्या खंडपिठाने ‘थट्टा-मस्करी करणे, हा फौजदारी गुन्हा ठरतो का ?’, असा प्रश्न उपस्थित करत या आदेशाला स्थगिती दिली.
काय आहे प्रकरण ?
परमेश्वर यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ अधिवक्ता के.एन्. फणींद्र म्हणाले की, एका स्पर्धेत दक्षिण कन्नडचा संघ जिंकला होता. त्यानंतर परमेश्वर यांनी केवळ मजेत ‘मी ५०० रुपयांची पैज लावून हरलो’, असे म्हटले होते. (राजकारण्यांचे वर्तन आदर्शत्वाला धरून असले पाहिजे. अर्थात् काँग्रेससारख्या भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या पक्षाच्या मंत्र्यांकडून कोणती अपेक्षा करायची ? – संपादक)
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !