अनेक हिंदूंचे केले आहे धर्मांतर
टोळीतील १३ सदस्यांना ६ राज्यांतून आधीच झाली आहे अटक

आगरा (उत्तरप्रदेश) – आगर्यातील २ सख्ख्या हिंदु बहिणींचे धर्मांतर करणार्या मुसलमानांच्या टोळीच्या मुख्य सूत्रधारावर कारवाई चालू झाली आहे. सय्यद दाऊद असे त्याचे नाव असून मध्यप्रदेशातील भोपाळ येथे असलेल्या त्याच्या घरावर पोलिसांनी नियंत्रण मिळवले आहे. दाऊद सध्या कॅनडात रहात असल्याची माहिती अन्वेषणातून समोर आल्याने त्याला तेथून परत आणण्याची सिद्धता चालू आहे. दाऊद कॅनडातून भारतातील टोळीला रसद पुरवत असल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले आहे.
१. वर्ष २०२५ मध्ये आगर्यातील दोघी बहिणी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. दोघींचे धर्मांतर करून त्यांना एका मोठ्या टोळीत सहभागी करून घेतल्याचे नंतर समोर आले.
२. मोठी टोळी कार्यरत असल्याचेही नंतर समोर आले. यानंतर ६ राज्यांतून या टोळीच्या १३ सदस्यांना देहली, जयपूर, मुझफ्फरनगर आणि गोवा येथून अटक करण्यात आली. तसेच दोन्ही बहिणींची सुटका करून त्यांना कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.
३. मूळचा भोपाळचा रहिवासी सय्यद दाऊद हा या टोळीला परदेशातून पैसे पुरवण्याचे काम करत होता. त्याचा संपर्क पाकमधील काही लोकांशी असल्याचेही समोर आले. तो कॅनडात बसून या टोळीला सूचना देत असे.
कॅनडातून प्रत्यार्पणाची सिद्धता
पोलीस उपाधीक्षक आदित्य सिंह यांनी सांगितले की, सय्यद दाऊद हा या टोळीचा मुख्य अर्थसाहाय्यक असून तो सध्या कॅनडात लपून बसला आहे. त्याच्याविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केल्यानंतर आता दूतावासाच्या माध्यमातून त्याला भारतात आणण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया चालू करण्यात येईल.
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त