अश्लील व्हिडिओ आणि संदेश पाठवून शारीरिक संबंधांसाठी दबाव !

मुंबई – एका आस्थापनात ‘टेलिकॉलर’ (ग्राहकांच्या सेवेसाठी आस्थापनात असलेली संपर्कयंत्रणा) म्हणून काम करणार्या अश्रफ सिद्दिकी (वय १९ वर्षे) याने सहकारी हिंदु युवतीच्या भ्रमणभाषवर अश्लील व्हिडिओ आणि संदेश पाठवून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीवरून आग्रीपाडा पोलिसांनी अश्रफ सिद्दिकी याला अटक केली. तो काम करत असलेल्या आस्थापनात नोकरीनिमित्त मुलाखत देण्यासाठी आलेल्या हिंदु युवतींच्या भ्रमणभाष क्रमांकांवरही संपर्क करून त्यांनाही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न अश्रफ याने केल्याचे पोलीस अन्वेषणात आढळून आले आहे.
पीडित हिंदु युवतीने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, अश्रफ तिला नियमितपणे अश्लील व्हिडिओ आणि संदेश पाठवत होता. या संदेशांमध्ये ‘मला हिंदु मुलीच आवडतात’, ‘सध्या हिंदु युवती मुसलमान युवकांनाच पसंत करतात’ अशा प्रकारचे संदेश असल्याचे पीडित युवतीने सांगितले. यावरून अश्रफ हा हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत असल्याचे दिसून येते. अश्रफ देत असलेल्या त्रासाविषयी पीडित युवतीने वडिलांना सांगितल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील अन्वेषण चालू आहे. अश्रफ हा समाजवादी पक्षाच्या नगरसेविका इरम सिद्दीकी यांचा भाचा आहे.
भाजपचे स्थानिक पदाधिकारी नितीन बनकर यांनी नाशिकप्रमाणे हा ‘कॉर्पाेरेट जिहाद’चा प्रकार असल्याचे म्हटले असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी