
नवी देहली – जिहादी आतंकवादी संघटना जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अजहर अत्यंत गंभीर आजारी असून कदाचित् आयुष्याचे शेवटचे श्वास मोजत आहे, असे म्हटले जात आहे; मात्र भारतीय गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे की, मसूद अजहरची प्रकृती इतकी गंभीर नाही; परंतु तो शारीरिकदृष्ट्या दुर्बल आणि मानसिकदृष्ट्याही पूर्णपणे खचलेला आहे. आतंकवादी संघटनेचे नेतृत्व जाणीवपूर्वक त्याला लपवून ठेवत आहे, जेणेकरून अन्य आतंकवाद्यांचे खच्चीकरण होऊ नये.
भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मसूद अजहर याच्या कुटुंबियांतील अनेक जण ठार झाले होते. यामुळे तो अद्यापही धक्क्याखाली आहे. यानंतर त्याने स्वतःला जवळजवळ पूर्णपणे वेगळे करून घेतले आहे. पूर्वी तो प्रतिदिन संघटनेच्या लोकांना भेटत होता आणि नवीन भरती झालेल्या लोकांशी संवादही साधत होता; परंतु आतातो आता असे अजिबात करत नाही.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक