उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाकडून अटक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने हिजबुल्ला अली खान (तुषार चौहान) आणि समीर खान या दोन आतंकवाद्यांना अटक केली आहे. हे दोघेही पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा) आणि पाकिस्तानी गुंड यांच्या संपर्कात होते अन् देशातील संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करण्याचा कट रचत होते. दोघेही सामाजिक माध्यमांद्वारे पाकमधील ‘हँडलर्स’शी (आतंकवाद्यांना आदेश देणार्यांशी) जोडले गेले होते. ते भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी ‘स्लीपर सेल’ (छुप्या पद्धतीने आतंकवाद्यांना साहाय्य करणारे धर्मांधांचे स्थानिक गट) सिद्ध करण्याच्या दिशेने काम करत होते. हिंदु तरुण तुषार धर्मांतर करून मुसलमान बनला होता.
🚨 UP ATS Arrests Hizbullah Ali Khan (also known as Tushar Chauhan) and Sameer Khan.
A shocking case has emerged where a Hindu youth was radicalised by Pakistani Handler, and was then instructed to carry out grenade attacks on houses. 💣
Limited religious awareness among Hindu… pic.twitter.com/uJ4Ug4mxNN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 27, 2026
१. दोघेही आतंकवादी ‘इंस्टाग्राम’ ‘टेलिग्राम’ आणि ‘व्हीओआयपी’ यांच्या माध्यमातून पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी अन् त्याच्या सहकार्यांच्या संपर्कात आले होते. हिजबुल्लाने चौकशीत सांगितले की, सामाजिक माध्यमांवर तो हळूहळू कट्टरतावादी विचारांनी प्रभावित झाला आणि इस्लामचे पालन करू लागला.
२. शहजाद भट्टीने बनावट सामाजिक खात्याद्वारे त्याच्याशी संपर्क साधला. हिजबुल्लाला काही लोकांच्या घरांवर ग्रेनेड फेकण्याचे आणि त्यांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्याचे काम देण्यात आले होते. यासाठी त्याला आधी ५० सहस्र रुपये आणि काम पूर्ण झाल्यावर अडीच लाख रुपये देण्याचे आमीष दाखवण्यात आले होते. त्याला शस्त्रे पुरवण्याचे आणि दुबईमार्गे पाकिस्तानला बोलावण्याचे आश्वासनही देण्यात आले होते.
३. दुसरीकडे समीर खान याला ‘तहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान’शी जोडून भिंतींवर संघटनेची नावे लिहिण्याची आणि नवीन लोकांना आतंकवादी जाळ्यामध्ये सहभागी करण्याचे दायित्व देण्यात आले होते. दोघांनी मिळून संभाव्य लक्ष्यांची पहाणीही चालू केली होती.
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !